आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२२ जूनपर्यंत करा फार्मसीसाठी अर्ज, यंदा संयुक्त सीईटीद्वारे फार्मसी प्रवेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी २२ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. राज्यात दोन ठिकाणी असलेल्या फार्मडीसाठीची प्रवेश प्रक्रियाही सुरू आहे. यंदा संयुक्त सीईटीद्वारे फार्मसी प्रवेश होत आहेत. तंत्रशिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा यंदा अधिकाधिक विद्यार्थिकेंद्रित करण्यात आल्याचा दावा तंत्रशिक्षण विभाग करत आहे. औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी मागील वर्षी स्वतंत्र सीईटी घेण्यात आली होती. यंदा प्रथमच मेडिकल, इंजिनिअरिंग आणि फार्मसीसाठी एकत्र सीईटी घेण्यात आली. त्यासह प्रवेश प्रक्रियेतही यंदा बदल करण्यात आले आहेत.
प्रवेशाच्या चार फेऱ्या होणार आहेत. त्यात ‘फ्रीज’, ‘फ्लोट’, ‘स्लाइड’ असे पर्यायही आहेत. बी.फार्मसीसाठी विद्यार्थ्यांना २२ जूनपर्यंत ऑनलाइन अर्ज करावयाचे आहेत. त्यानंतर सुविधा केंद्रात जाऊन अर्जनिश्चिती करावयाची आहे. शनिवारी ऑनलाइन नोंदणीचा पहिला दिवस असल्याने सुविधा केंद्रावरही विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती.

‘फार्मडी’साठीची प्रवेश प्रक्रिया
:फार्मसीमध्ये फार्मडी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियाही आजपासून सुरू झाली आहे. बारावीनंतर सहा वर्षांचा हा अभ्यासक्रम आहे. एक वेगळे करिअर म्हणूनही या अभ्यासक्रमाकडे पाहिले जाते. राज्यात शासकीय महाविद्यालयांमध्ये औरंगाबाद अमरावती येथील शासकीय औषधनिर्माणशास्त्र कॉलेज अशा दोन ठिकाणी हा अभ्यासक्रम चालवला जातो. त्याची प्रवेश प्रक्रियाही बी.फार्मसीप्रमाणे राबवण्यात येत आहे.
पुढे वाचा... कशी आहे प्रवेश प्रक्रिया
बातम्या आणखी आहेत...