आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Apply Schedule Crops According To Climate Change

जलपुनर्भरणावर भर द्या, हवामान बदलानुसार पिकांचे नियोजन करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अल निनोचा प्रभाव, हवामानातील बदल यामुळे सलग दुसऱ्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. याचबरोबर पावसाचे वितरण सर्वत्र विषम राहणार आहे. मोठ्या खंडाने पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून शेतकऱ्यांनी खरीप पेरणी, पिकांचे नियोजन करावे. पावसाच्या मोठ्या खंडात पीक जगवणे आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी आतापासून जलपुनर्भरणावर जास्त भर द्यावा, असे आवाहन हवामान, कृषी तज्ज्ञ, जलतज्ज्ञांनी केले आहे.
मान्सून उशिरा दाखल झाला तरी शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. १५ जुलैपर्यंत पेरणी करता येते. त्यानंतर मूग, उडीद या पिकांची पेरणी करणे योग्य नाही. या पिकांऐवजी बाजरी, तूर, ज्वारी, मका या िपकांना जास्त महत्त्व द्यावे. ३० जुलैपर्यंत बाजारी, मका, सोयाबीन, कापूस, तुरीची पेरणी करता येते. जमिनीचा पोत, सुपीकता तपासून पीक घ्या उत्पादन खर्च वाचवा, असे कृषी शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी सांगितले.
तंत्रज्ञानाचा वापर करा
बीज उत्पादन, भाजीपाला, फूल पिकांसाठी हवामान नियंत्रित ठेवावे लागते. यासाठी शेडनेट, पॉली हाऊस, हरितगृहाचा वापर करावा. यासाठी सरकारच्या वतीने ४४ टक्क्यांपर्यत अनुदान दिले जाते. बँक कर्जाची मदत मिळते.
आंतरपिकांना महत्त्व द्या
- कपाशीबरोबर मूग+उडीद+ तूर
- तूर+सोयाबीन
- तूर+मूग+उडीद
- कपाशी+तीळ+मटकी
- मूग+उडीद+बाजरी
- बाजरी+सोयाबीन
वरीलप्रमाणे आंतरपीक पेरणी करावी. यामुळे तृणधान्य, कडधान्य आणि गळीत धान्य उत्पादनात वाढवून उत्पादकांना शाश्वत उत्पादन घेणे शक्य होईल, असा विश्वास विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, माजी कृषी सहसंचालक जनार्दन जाधव यांनी व्यक्त केला.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, कशी करावी दुष्काळावर मात...