आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Apposition Party Leader Raju Tanwani Arrested In Aurangabad

पालिका निवडणूक : अपक्ष राजू तनवाणी यांना अटक सुटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी राजू तनवाणी आणि त्यांच्या तीन प्रतिनिधींवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा रविवारी रात्री दाखल करण्यात आला होता. सोमवारी दुपारी १२ वाजता तनवाणी यांना सिटी चौक पोलिसांनी अटक केली. त्यानंतर तासाभरात त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
मनपा निवडणुकीत मतदारांना पैसे वाटपप्रकरणी गुलमंडी वॉर्डातील अपक्ष उमेदवार, भाजप प्रचार समितीचे सहप्रमुख, माजी आमदार किशनचंद तनवाणी यांचे बंधू राजू तनवाणी यांच्यासह चौघांविरुद्ध सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक नागनाथ कोडे यांना रविवारी रात्री ११ वाजता रंगारगल्लीत पैसे वाटप सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पथकाने शेख मोहसीन शेख मोईन, शेख नसरुद्दीन शेख नरोद्दीन, सिद्दीक खान युनूस खान यांना पैसे वाटत असताना अटक केली. त्यांच्याकडे तनवाणी यांचे निवडणूक चिन्ह असलेल्या शिटीचे स्टिकर्स, पत्रके, १३ हजार रुपये रोख सापडले होते.