आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंजूर ३३ पैकी केवळ नऊच चारा छावण्या सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यात३३ चारा छावण्या मंजूर होऊनही केवळ चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात राज्य शासनाने अध्यादेश काढून पंधरा दिवस लाेटले तरी चारा छावण्यांच्या संख्येत अजूनही वाढ झालेली नाही. यामुळे सरकारचा केवळ घोषणांचा पाऊस सुरू असल्याची टीका होत आहे.
मराठवाड्यात चाऱ्याचा प्रश्न बिकट असल्यामुळे दोन आठवड्यांपूर्वीच बीड, उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये चारा छावण्या सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार प्रशासकीय पातळीवरून प्रस्तावदेखील मागवण्यात आले होते. यामध्ये ५३ जणांचे अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले होते. मात्र प्रत्यक्षात काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत नाही.
बीडमध्येसर्वाधिक चारा छावण्या
गायबझालेल्या पावसामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही बिकट झाला आहे. शासनाचा निर्णय होऊनही प्रत्यक्षात चारा छावणी सुरू होण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची वाट पाहावी लागली. सध्या बीड जिल्ह्यात पाच, लातूरमध्ये आणि उस्मानाबादमध्ये केवळ चारा छावणी सुरू करण्यात आली. दोन दिवसांपूर्वीच माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनीदेखील चारा छावण्या सुरू होत नसल्याबद्दल राज्य सरकारच्या धोरणावर टीका केली होती.

^चाराछावण्यांच्या बाबतीत प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. काहींना जागेच्या तर काहींना तांत्रिक अडचणी आहेत. मात्र लवकरच आवश्यकतेनुसार छावण्या सुरू केल्या जातील. डॉ.उमाकांत दांगट, विभागीय आयुक्त, औरंगाबाद

केवळ घोषणाच
दुष्काळाच्या चटक्यामुळे शेतकऱ्यांसमोर चाऱ्याचे गंभीर संकट आहे. खरीपही हातचे गेल्यामुळे चारा विकत घेण्याची शेतकऱ्यांची परिस्थिती उरलेली नाही. पाऊस नसल्यामुळे गवत मिळणेदेखील अवघड झाले आहे. एकीकडे सरकारने गोवंश हत्याबंदीचा आदेश काढल्यामुळे जनावरे विक्री काढता येत नाहीत. तर शेतकऱ्यांकडे चारा नसल्यामुळे जनावरांना जगवता येत नाही. त्यामुळे शेतकरी दुहेरी कात्रीत सापडला आहे. त्यामुळे हा केवळ घोषणांचा पाऊस असल्याची प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे प्रमुख कैलास तवार यांनी व्यक्त केली आहे.

मराठवाड्यातल्या चारा छावण्यांची स्थिती
जिल्ह्यांचीमंजूर सुरू मोठी छोटी एकूण नावे छावण्या छावण्या जनावरे जनावरे जनावरे
{बीड १७०५ ३७७९ ४४० ४२१९
{लातूर १००३ १७५४ २५७ २०११
{उस्मानाबाद ०६०१ २४३९ २१७ २६५६
{एकूण ३३०९ ७९९२ ९१४ ८८८६