आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जलयुक्त शिवार’मुळे विहिरींचे पाणी तीन मीटरने वाढले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यात जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवण्यात आल्याने वाहून जाणाऱ्या पाण्याचा जागोजागी संचय झाला आहे. विहिरींची पाणीपातळी एक ते तीन मीटरने वाढली आहे. शिवाय जलयुक्त शिवारात साचलेल्या पाण्यातून लाख ९५ हजार ८५६ हेक्टरवरील पिकांना एका पाळीसाठी तर दोन संरक्षित सिंचनांसाठी लाख ९७ हजार ९२८ हेक्टर क्षेत्रासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. यातून रब्बीतील गहू, ज्वारी, हरभरा,भाजीपाला, सूर्यफूल, करडई पिकाला पाणी देणे, फळबागा जगवणे सहजशक्य झाले आहे. शिवाय पशुधन वन्यजीवांना पिण्याचे मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे.
सततच्या दुष्काळावर मात करणे, शाश्वत सिंचन क्षेत्र वाढवणे, भीषण पाणीटंचाई दूर करणे, पशुधन वन्यजीवांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, पावसाच्या खंडात पीक जगवणे, भूजल पातळीत वाढ करणे यासारखे विविध कल्याणकारी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सरकारच्या वतीने मराठवाड्यात जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. याअंतर्गत आठही जिल्ह्यात ढाळीचे बांध, बांधबंदिस्ती, सलग समतल चर, खोल सलग समतल चर, मातीनाला बांधकाम, पाझर तलाव, लघुसिंचन तलाव, शेततळे, वनतळे, खोदतळे, सिमेंट नालाबांध, साठवण बंधारा, भूमिगत बंधारा, केटीवेअर कोल्हापुरी बंधारे, विहिरी बोअरवेल पुनर्भरण, शोषखड्डे, जलभंजन, जुन्या पाणीसाठ्याचे खोलीकरण, गाळ काढणे, दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. परतीचा मान्सून चांगला बरसल्यामुळे लातूर कृषी विभागात जलसंधारणात १,२५,६७३ टीसीएम आणि जलयुक्त शिवारमधील कामामुळे ८७,१९१ टीसीएम पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. विहिरीच्या पाणीपातळीत ते मीटरपर्यंत वाढली आहे. औरंगाबाद कृषी विभागात जलसंधारणात ३६,७५७४.४२ आणि जलयुक्त शिवारात १६९६५८.७४ टीसीएम पाणी साचले आहे. विहिरीची पाणीपातळी एक ते अडीच मीटरने वाढली आहे. एकूण पाण्याच्या संचयाचा विचार करता मराठवाड्यातील लाख ९५ हजार ८५६ हेक्टरवरील पिकांना एका पाळीसाठी तर दोन संरक्षित सिंचनांसाठी लाख ९७ हजार ९२८ हेक्टर क्षेत्राला पाणी िमळणार आहे. पाण्याचा योग्य काटकसरीने वापर करण्यासाठी विशेष भर देणार असल्याचे विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी सांगितले.

पुढे काय ?
पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा. ठिबक, तुषार, सूक्ष्म सिंचनाचा वापर करून जास्तीत जास्त शेती सिंचनाखाली आणण्यासाठी नियोजन करावे. तांत्रिक बाजू तपासता करण्यात आलेली धोकादायक कामांची पुनर्दुरुस्ती करावी, तरच जलयुक्त शिवार खऱ्या अर्थाने सत्यात उतरेल, असे कृषितज्ज्ञांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...