आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोहेंजोदडोच्या उत्खननात औरंगाबादी!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - काळाच्या पडद्याआड लपलेल्या अत्यंत प्रगत आणि प्राचीन अशा मोहेंजोदडोच्या संस्कृतीला उजेडात आणण्याचे काम भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याच्या औरंगाबाद कार्यालयाने केले आहे. खूपच कमी लोकांना याबाबत माहिती असून, यासंबंधीचे पुरावे, नोंदी आजही येथील कार्यालयात उपलब्ध आहेत. मोहेंजोदडोच्या उत्खननाच्या काळात म्हणजे १९२०च्या सुमारास औरंगाबाद सर्कलला पश्चिम सर्कल असे नाव होते. मुंबई प्रांतातील पाकिस्तानसह गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटकातील पुरातन वास्तू या कार्यालयाच्या अखत्यारीत होत्या. यामुळे उत्खननाची सर्व सूत्रे औरंगाबादेतूनच हलली होती. निर्माता आशुतोष गोवारीकर यांनी अलीकडेच या विषयावर चित्रपट काढला असून, त्यासाठीही त्यांनी पुरातत्त्व खात्याची मदत घेतली.
सध्या पाकिस्तानच्या सिंध प्रांतात असलेल्या मोहोंजदडो संस्कृतीचा शाेध अपघातानेच लागला. दीडशे वर्षांपूर्वी लाहोर-मुलतान रेल्वेमार्ग उभारणीच्या वेळी कंत्राटदाराला काही विटा सापडल्या. त्या प्राचीन घरांच्या असल्याचे अलेक्झांडर कनिंगहम यांच्या लक्षात आले. परंतु या अवशेषांना फारसे गांभीर्याने घेतले गेले नाही. पुढे सर जाॅन मार्शल यांनी १९२० ते १९२३ या काळात उत्खनन केले.

१९१९-२० मध्ये एएसआयच्या पथकाने स्थळाची पाहणी केली. पुरातत्त्व खात्याचे वरिष्ठ अधिकारी राखालदास बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली १९२० ते २२ या काळात पहिले उत्खनन झाले. पुढे १९२५ ते २६ या काळात दयाराम साहनी यांच्या नेतृत्वाखाली दुसरे उत्खनन झाले. १९३२पर्यंत उत्खनने सुरू होती. १९४७ मध्ये फाळणीनंतर हा भाग पाकिस्तानात गेला.

कागदपत्रे उपलब्ध
^मोहेंजोदडोचे उत्खनन आमच्या कार्यालयाद्वारे झाले याचा अभिमान वाटतो. यासंबंधीची कागदपत्रे आमच्याकडे आहेत. गोवारीकर यांच्या चित्रपटामुळे नवी पिढी बोलत आहे ही चांगली बाब आहे. -शिवकांत बाजपेयी, उपअधीक्षक पुरातत्त्वज्ञ, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग, औरंगाबाद सर्कल
बातम्या आणखी आहेत...