आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Architect Ajay Kulkarni Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऐतिहासिक कला वारसामध्ये औरंगाबाद समृद्घ - आर्किटेक्ट अजय कुलकर्णी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबाद शहर ऐतिहासिक कलेने सर्वगुण संपन्न आहे. गेल्या 2000 हजार वर्षांपूर्वींच्या गोष्टी आजही परदेशी पर्यटक कुतूहलाने बघायला येतात, परंतु शहरातील हा ऐतिहासिक वारसा लयास जाण्याची भीती वाटत असल्याची खंत राज्य पुरस्काराने सन्मानित आर्किटेक्ट अजय कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टच्या महाराष्ट्र शाखेतर्फे अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन फिल्ड ऑफ आर्किटेक्चर अँड एज्युकेशन या पुरस्काराने कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले. 19 सप्टेंबरला सांगली येथे झालेल्या महाकॉन 2014 सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या गौरवानिमित्त घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे हा कुलकर्णी यांचा विषय आहे. विविध संस्था, संघटनांच्या माध्यमातून या प्रश्नाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. शहरातील परिस्थिती आता बदलली : कुलकर्णी म्हणाले की, शहरात पूर्वी प्रत्येक 10 किलोमीटरवर एक ऐतिहासिक वास्तू पाहावयास मिळत होती, पण आता तशी परिस्थिती
राहिली नाही. शहरात आजही ऐतिहासिक वास्तू मोठ्या डौलाने उभ्या आहेत व त्या वैशिष्टपूर्ण आहेत. त्यांचे ते वैशिष्ट्य तज्ज्ञांच्या व पर्यटकांच्या नजरेत आणून द्यायला हवे. प्रत्येक शहरवासीयांत हे शहर आपले आहे, अशी भावना निर्माण व्हायला हवी. नहर-ए-अंबरी, 52 दरवाजे, पाणचक्की अशा वास्तू आपल्या दैनंदिन जीवनातीलच भाग समजले पाहिजे. याचवरोबर शहरात निर्माण होणारी प्रत्येक इमारत ही वैशिष्टपूर्णच असायला हवी.
फक्त वेरूळ-अजिंठा पाहून पर्यटक परत फिरू नयेत तर ते शहरातही फिरावेत, असे काही तरी काम करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

इमारती, वास्तूतही आत्मा
इमारत, वास्तूंमध्येही प्राण असतो. त्यातही आत्मा असतो. त्यांच्यात भावना असतात, जाणिवा असतात. वास्तू कायम संवाद साधत असते. त्यामुळे वास्तू निर्माण करताना त्याचा सर्व दृष्टीने विचार झाला पाहिजे. फक्त इमारत उभी करणे एवढेच उद्दिष्ट असू नये, त्यांची मनापासून जोपासणा होणे गरजेचे आहे, असेही कुलकर्णी म्हणाले.