आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Are You Okey, Guardian Minister Kadam Question To Janjal

तुझे दोन तंगडे व्यवस्थित आहेत ना? खैरेंनी तसे बोलायला नको होते - रामदास कदम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शिवसेनेत सुरू असलेल्या खैरे-जंजाळ पुराणाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री रामदास कदम मंगळवारी सायंकाळी औरंगाबादेत आले होते. त्यामुळे कदमांकडे काय तक्रारी केल्या जातात अन् त्यावर कदम काय भाष्य करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु कदमांनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही. ‘तुझे दोन तंगडे व्यवस्थित आहेत ना?’ असा पहिलाच प्रश्न त्यांनी जंजाळ यांना केला आणि त्यानंतर म्हणाले, ‘खैरे यांनी तसे बोलायला नको होते. परंतु ते बोलले तर त्यानंतर तुम्हीही त्यांच्या घरी जायला नको होते.’ एवढ्याच चर्चेनंतर कदम यांनी हा विषय संपवला.
उस्मानाबादला जाण्यासाठी कदम यांचे सायंकाळी विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी महापौर त्र्यंबक तुपे, माजी आमदार तथा महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे नरेंद्र त्रिवेदी, सहसंपर्कप्रमुख अण्णासाहेब माने, शहरप्रमुख राजू वैद्य यांच्यासह काही नगरसेवक उपस्थित होते. नियोजित दौैऱ्यानुसार कदम हे काही वेळ सुभेदारी विश्रामगृहावर थांबणार होते. त्यामुळे त्यांच्या भेटीसाठी अन्य कार्यकर्तेही थांबले होते. परंतु उस्मानाबादेत पोहोचण्यास विलंब होईल म्हणून त्यांनी शहरात येण्याचे टाळले. त्यामुळे विमानतळावरच त्यांनी वरील कार्यकर्त्यांशी चर्चा केली अन् ते उस्मानाबादकडे निघाले. खैरेंच्या वक्तव्यापेक्षा त्यानंतर जंजाळ यांनी केलेल्या कृतीमुळेच हा प्रकार जास्त चर्चेत आला. त्यामुळे यापुढे या प्रकरणावर सेना नेते काय भाष्य करतात, याकडे तमाम शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.

पुढे वाचा, त्रिवेदींची कोलांटउडी?, १५० कोटींच्या घरवापसीमुळे भाजपमध्ये उडाली खळबळ