आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुनावर बाण, कमळ रुतले चिखलात; सेना-भाजपची चांगलीच गाेची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपच्या प्रीती मेनन यांनी शिवसेनेचे अर्जुन खाेतकर यांच्यावर आराेपांचे बाण राेखलेत, तर दुसरीकडे सेबीनेही भाजपचे सुभाष देशमुख यांच्या लाेकमंगल समूहावर ताशेरे आेढल्याने सेना-भाजपची चांगलीच गाेची झाली आहे. दाेन्ही पक्ष आता पक्षांतर्गत स्वच्छता करणार का, असा सवाल केला जाताेय.

वयाच्या २८ व्या वर्षी झाले शिवसेनेचे आमदार
शिवसेनाप्रमुखांनी १९९० मध्ये जालना विधानसभा मतदारसंघातून खाेतकर यांना शिवसेनेची उमेदवारी दिली आणि अवघ्या २८ व्या वर्षी ते आमदार झाले. त्यानंतर १९९५, २००४ आणि २०१४ मध्ये या मतदारसंघातून ते शिवसेनेचे आमदार झाले. १९९५ मध्येही ते राज्यमंत्री हाेते.

अर्जुन पंडितराव खोतकर
जन्म : १ जानेवारी १९६२, वखारी वडगाव (ता.जालना)
शिक्षण : एम. कॉम. जेईएस कॉलेज जालना

मालमत्ता : खाेतकर यांच्या नावे जंगम व स्थावर मालमत्ता ४ काेटी ४८ लाख ३६ हजार ५३७ तर पत्नीच्या नावावर १ कोटी ५९ लाख ३३ हजार ७०५ रुपयांची मालमत्ता आहे. मुलीच्या नावे ३ लाख ८ हजार १२८ व मुलाच्या नावे १ लाख ५१ हजारांची मालमत्ता आहे.

आरोप हास्यास्पद
प्रिती मेनन शर्मा यांनी केलेले आरोप हास्यास्पद, बिनबुडाचे व तथ्यहीन आहेत. यासंदर्भात उद्या मी पत्रकार परिषद घेऊन मेनन यांच्या आराेपांवर सविस्तर खुलासा करणार आहे. - अर्जुन खोतकर, राज्यमंत्री.

तीन गुन्हे दाखल, एका गुन्ह्यात निर्दोष मुक्तता
शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याविरुद्ध तीन गुन्हे दाखल आहेत. यातील दोन गुन्हे हे विविध समस्या आणि मागण्यांसाठी काढलेल्या मोर्चे, आंदोलने या कारणामुळे दाखल आहेत. त्याशिवाय त्यांच्यावर कलम ३०६ नुसार एक गुन्हा दाखल होता त्यात जालना सत्र न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. दुसरीकडे मेनन यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत खाेतकर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आराेप केले असून घाणेवाडीच्या पाइपलाइनवर खाेतकर यांनी बांधकाम केले, जालन्यातील एपीएमसीचा २०१५ चा महसूल ५०० काेटी असताना एपीएमसीला केवळ ६ काेटीही मिळाले नसल्याचे मेनन यांनी म्हटले आहे. जालन्यातील बाजार समितीच्या जुना माेंढा शाखेच्या ठिकाणी अर्जुन खाेतकर बिझनेस सेंटर उभारल्याचाही मेनन यांचा आराेप आहे.

पुढे वाचा, दोन वेळा बनले आमदार, विविध उद्याेगांच्या माध्यमातून लाेक(अ)मंगल
बातम्या आणखी आहेत...