आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस दलात आर्मरच्या ५२९ जागा भरणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्य पोलिस दलात आर्मरच्या (आयुधिक) नवीन ५२९ जागा भरण्यात येणार असल्याचे शपथपत्र गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी आैरंगाबाद हायकोर्टात दाखल केले. वित्त, सामान्य प्रशासन नियोजन विभागाच्या सल्ल्याने आर्मर शाखेची उभारणी केली जाईल. या निवेदनामुळे न्या. रवींद्र बोर्डे न्या. पी. आर. बोरा यांनी जनहित याचिका निकाली काढली.

महाराष्ट्र पोलिस दलात डॉग स्कॉड, वायरलेस, दरोडा प्रतिबंधक पथक, स्थानिक गुन्हे शाखा आदी पंधरापेक्षा जास्त शाखा आहेत. राज्य पोलिस दलात आर्मरचा स्वतंत्र विभाग असावी यासाठी आमदार संजय शिरसाट आर्मर पांडुरंग धर्मा गायकवाड यांनी अॅड. अभयसिंह भोसलेंमार्फत हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली.
याचिकेतील मागण्या : पोलिसमॅन्युअल १९९९ मध्ये सुधारणा झाल्या. कलम ५८ (ए), ५५ (ए) प्रमाणे वन स्टेप प्रमोशन आर्मरला मिळावे. तांत्रिक विभाग असल्याने आऊटफोर्स ड्यूटी देण्यात येऊ नये. राज्यस्तरावर या विभागासाठी पोलिस अधीक्षकांची नियुक्ती करून आर्मर विभाग सरळ त्यांच्या अखत्यारीत देण्यात यावा. १९९३ मध्ये संपूर्ण राज्यासाठी एक पोलिस अधीक्षक नियुक्त करण्याचे नमूद केले होते. राज्यात दीड लाख शस्त्रे असून हजार आर्मरची आवश्यकता आहे.
विशेष प्रशिक्षणाची तरतूद
पोलिस मॅन्युअल १५३ नुसार ईएमई कोर्सची तरतूद असून हा कोर्स करून पदव्युत्तर शिक्षण घेतलेले असेल, तर पोलिस उपनिरीक्षक करण्यात यावे. त्यामुळे शस्त्र प्रमाणित करण्याचे अधिकार प्राप्त होतात. आर्मरची भरती मागील काही वर्षांत झालेली नाही. १९९८ पर्यंत गिरिराजसिंह हे एकमेव अधीक्षक होते. त्यानंतर या विभागास अधीक्षक मिळाले नाहीत.
शपथपत्र दाखल
राज्याच्या गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांनी शपथपत्र दाखल करून विशेष पोलिस महानिरीक्षक राज्य राखीव दल, विशेष पोलिस महानिरीक्षक आस्थापना गृह सचिवांमार्फत आर्मरची स्वतंत्र शाखा उभारणीसाठी प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. तिन्ही अधिकाऱ्यांनी अहवाल सादर करून यासंबंधीच्या त्रुटी कळविण्याचे सांगण्यात आले आहे. शासन याकडे तातडीची बाब म्हणून बघत आहे. याचिकाकर्त्याच्या वतीने अॅड. अभयसिंह भोसले यांनी बाजू मांडली.