आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहाराचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी; ग्राहकांचे बुकींगचे पैसे परत दिले नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सहाराचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय. - Divya Marathi
सहाराचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय.
औरंगाबाद- सहाराचे सर्वेसर्वा सुब्रतो रॉय यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.  सहारा सिटीत घर बुक केलेल्या ग्राहकांनी बुकींगचे पैसे परत न मिळाल्याने ग्राहक मंचाकडे लेखी तक्रार केली होती. त्यानंतर ग्राहक मंचाने हे वॉरंट जारी केले आहे. 
 
समृद्ध लाइफस्टाइलची हमी देणार्‍या सहारा समूहाने ‘सहारा सिटी होम्स’च्या औरंगाबादेतील 550 ग्राहकांना उंची घरांचे स्वप्न दाखवले. 2005 पासून या प्रकल्पात ग्राहकांनी अनामत रक्कम भरून बुकिंग केली. अंदाजे 20 ते 25 कोटी रुपये जमा करण्यात आले. पैसे गुंतवणारे शहरवासी हवालदिल झाले आहेत. सहारा समूह विविध क्षेत्रांत कार्यरत आहे. समूहाकडे भारतीय क्रिकेट संघाचे प्रायोजकत्व होते. आयपीएल सामन्यातही पुणे संघ सहाराकडे होता. 
 
सहारा सिटी होम्स
सहारा समूहाची देशभरात सुमारे 40 हजार एकर जमीन असून त्यावर विविध गृह प्रकल्पांचे काम सुरू आहे. सहारातर्फे उच्च दर्जाच्या, सर्व सुविधांनी परिपूर्ण अशा लॅव्हिश टाऊनशिप विकसित केल्या जातात. पुण्यातील ‘अँबी व्हॅली’ त्यापैकीच एक. त्या धर्तीवरच औरंगाबादेत बीड बायपास रोडवर कंपनीने 82 एकर जमिनीवर ‘सहारा सिटी होम्स’ या प्रकल्पाची योजना आखण्यात आली.
 
10 टक्के भरून बुकिंग
हे सर्व काम 4 टप्प्यात पूर्ण करण्याचे कंपनीचे ध्येय होते. प्रत्येक टप्प्यात तब्बल 550 युनिट्स तयार केले जाणार होते. जाहिरात केल्यामुळे ग्राहकांनी घरे घेण्यासाठी गर्दी केली. मराठवाडाभर एजंट्सद्वारेही नोंदणी करण्यात आली. यासाठी प्रॉपर्टीच्या किमतीच्या 10 ते 15 टक्के रक्कम नोंदणी अनामत म्हणून जमा करून घेण्यात आली.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...