औरंगाबाद- नृत्य, नाट्य, चित्र, शिल्प अशा विविध कलांचा संगम काव्यपक्षाच्या निमित्ताने उलगडून दाखवणार्या गुरुकुल साधना शिबिराला 1 मेपासून सुरुवात झाली. महागामी गुरुकुलात सुरू झालेल्या या शिबिरात 61 शिष्यांनी सहभाग घेतला आहे.
ग्रीष्म ऋतूतील पहिले कलाशिबिर म्हणून नावारूपाला आलेल्या या शिबिराने कलावंतांची नवी पिढी उभारण्यात योगदान दिले आहे. दरवर्षी एक विशिष्ट थीम घेत हे शिबिर आयोजित केले जाते, त्याप्रमाणे यंदा कलांचा काव्यपक्ष या अंगाने शिबिरातील सर्व कलांविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. गायन, वादन आणि नृत्य या तिन्ही कलांमध्ये योगाभ्यासाला प्रचंड महत्त्व आहे. साधना शिबिराचा प्रारंभ योगाभ्यासाने होतो. यामध्ये नेचरोपॅथीच्या डॉ. हेप्सिबा योगसाधनेचे महत्त्व आणि प्रात्यक्षिक करवून घेतात.
काव्यपक्षाने खुलत जाणारे गायन
गायन ही सौंदर्यपूर्ण आणि सुर्शाव्य कला काव्यपक्षाच्या अंगाने खुलत जाते. जयंत नेरळकर आणि अमित ओक हे दोघे गायनाचे धडे विद्यार्थिनींना देत आहेत. यामध्ये नृत्यसंगीत आणि गायन संगीताचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येते. ठुमरी, धृपद, सावेरी पल्लवी, भैरवी, होरी, मोहना पल्लवी, मीराबाईंची पदे विद्यार्थ्यांना शिकवण्यात येत आहेत.
मोहिनीअट्टम, कथ्थक आणि ओडिसी
या शिबिरात नृत्याच्या दृष्टीने खुलत जाणारे काव्य विश्लेषणही करण्यात येत आहे. यामध्ये मोहिनीअट्टम, कथ्थक आणि ओडिसी यांच्या विविध पारंपरिक रचना विद्यार्थ्यांना शिकवल्या जात आहेत. मुंबई येथील मोहिनीअट्टम नृत्यांगना, गुरू सुजाता नायर आणि महागामी संचालिका पार्वती दत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर सुरू आहे.
मी इस्ट आफ्रिकेतील अदिस अबाबा शहरात राहते. भारतात आल्यावर आंतरिक ऊर्जा वाढवणारे काहीतरी आत्मसात करायचे होते. शिबिरातून इच्छा पूर्ण होईल, असे जाणवते. रूपल कोठारी
भौतिक संपन्नतेच्या युगामध्ये आंतरिक ऊज्रेची सर्वाधिक गरज आहेत. 16 वर्षांपासून या शिबिराच्या माध्यमातून अनेक कला उपासक निर्माण झाले आहेत.
पार्वती दत्ता,संचालिका
चित्र आणि शिल्पकला
चित्र आणि शिल्पांनाही एक काव्यात्मक भाषा आहे. ही बाब लक्षात घेऊन याही कलांचा आणि काव्याचा असलेला संबंध उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. अजिंठा-वेरूळची शिल्पे बोलकी, तसेच नृत्य-नाट्य कलेने परिपूर्ण असल्याचे दिसून येते, त्याची गुपिते या शिबिरात माणिक वालावलकर उलगडून दाखवत आहेत.
शिबिरात होणारे लक्षणीय कार्यक्रम
3 8 मे रोजी परळी वैजनाथ येथील ज्येष्ठ पखवाज वादक लटपटे महाराज तालवाद्य आणि काव्याचा आंतरसंबंध यावर कार्यक्रम सादर करणार आहेत.
310 मे रोजी नृत्यांगना, गुरू पार्वती दत्ता कथ्थक आणि ओडिसी नृत्याच्या दृष्टिकोनातून काव्याचे महत्त्व विशद करणारे सादरीकरण करणार आहेत.
311 मे रोजी इंदौरच्या कथ्थक नृत्यांगना सुचित्रा हरमलकर या रायगड घराण्याचे कथ्थक सादरीकरण आणि त्याचा काव्याशी असलेला संबंध उलगडून दाखवतील.