आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुरुजींनी चितारले निसर्ग, स्त्री चित्रे; बालपणींच्या आठवणींना उजाळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- दिवसेंदिवस पावसाचे कमी होणारे प्रमाण आणि पाण्याची वाट पाहणारा निसर्ग पावसाचे थेंब पडताच कसा बहरतो, तसेच वाढत जात असलेले स्त्री अत्याचार, स्त्री भ्रूणहत्यांचे प्रकार अशा विविध सामाजिक विषयांचा भाव शिक्षकांनी शुक्रवारी (30 ऑगस्ट) आपल्या कल्पनेतील चित्रातून मांडला.

नवभारत शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव कै. भानुदासराव वर्धावे यांच्या जयंतीनिमित्त ‘वर्धावे गुरुजी स्मृती स्पर्धा 2013’ स्पर्धा रोकडिया हनुमान रोड येथील शिशुविकास केंद्र प्राथमिक शाळेत घेण्यात आली. तीन गटांत ही स्पर्धा घेण्यात आली होती. पहिल्या गटातील पहिली ते चौथीच्या शिक्षकांसाठी निसर्गचित्र, माझा आवडता प्राणी, माझी आवडती व्यक्ती असे विषय देण्यात आले होते, तर दुसर्‍या गटातील पाचवी ते आठवीच्या शिक्षकांसाठी वृक्षारोपण, वाघ वाचवा, टीव्ही एक शाप आणि तिसर्‍या गटातील 9 वी आणि 10 वीच्या शिक्षकांसाठी रक्तदान र्शेष्ठदान, प्राणिसंवर्धन आणि बेटी बचाव असे विषय दिले होते. यासाठी शिक्षकांना अडीच तासांचा वेळ देण्यात आला होता.

शिक्षकांनी आपल्या बालपणींच्या आठवणींना पुन्हा उजाळा देत रंगाच्या साथीने निसर्गाचे वास्तव आणि पर्यावरणाचा बदलता परिणाम वन्यजीवांवर कसा होतोय हे चित्रातून मांडले, तर शिक्षिकांनी आपल्या चित्रातून स्त्री भ्रूणहत्या मांडली. शहरातील 40 शाळांमधील 90 शिक्षकांनी सहभाग नोंदवला. संस्थेचे सचिव संदीप वर्धावे, पुष्पा डोंगरे यांची उपस्थिती होती. नेहा कल्याणकर यांनी सूत्रसंचालन केले. वैजयंती दळवी यांनी आभार मानले.

सहा सप्टेंबरला बक्षीस वितरण
चित्रकला स्पध्रेचे बक्षीस वितरण 6 सप्टेंबर रोजी कै. गोविंदभाई र्शॉफ सभागृहात सकाळी 10 वाजता होणार आहे. या वेळी यशवंत कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य अशोक तांबटकर, प्रख्यात चित्रकार शीतल शहाणे यांची उपस्थिती राहणार आहे.