आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चित्रकार घडवण्यासाठी कला शिक्षकाची धडपड; आठ वर्षांपासून कार्यशाळा,

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - लहान मुलांमधील चित्रकलेच्या सुप्त गुणांना चालना देण्यासाठी एक कलाकार गेल्या 8 वर्षांपासून झटत आहे. दरवर्षी तो मुलांना एक थीम घेऊन त्यावर चित्र काढण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देतो. यंदा या चित्रकाराने 6 महिने महापुरुष व समाजसेवकांची चित्रे काढण्यास मुलांना शिकवले. यातून मुलांनी 60 चित्रे जिवंत केली.

जैन इंटरनॅशनल शाळेत रोहित राजेंद्र गिरी हे कला शिक्षक म्हणून काम करतात. चित्रकलेची आवड असणारी, पण मार्गदर्शनाअभावी कला बहरू न शकलेली अनेक मुले त्यांना भेटली. अशा मुलांसाठी काही करण्याची इच्छा होती. यासाठी गिरी यांनी स्वत: शासकीय कला महाविद्यालयातून बीएफए व नंतर एमएफए पदवी घेतली. गेल्या आठ वर्षांपासून मुलांमध्ये चित्रकलेतील बारकाव्यांची शास्त्रशुद्ध माहिती देण्यासाठी ते एक थीम घेऊन कार्यशाळा घेतात. त्यानंतर त्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरवतात.

यंदा भारताभिमान
आतापर्यंत रोहित यांनी श्रीकृष्ण, वॉल्ट डिस्ने अशा विषयांवर चित्रे काढण्याचे प्रशिक्षण दिले आहे. या वर्षी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या थोर स्वातंत्र्यसैनिकांचा विचार मनात आला. विद्यार्थी या महापुरुषांना त्यांची जयंती, पुण्यातिथी किंवा पुस्तकातील पाठापुरतेच लक्षात ठेवतात. त्यांची चित्रे साकारली, तर या महापुरुषांचे जीवन त्यांना समजू शकेल. त्यांचा अभ्यास होईल, हे रोहित यांच्या लक्षात आले. त्यानुसार यंदा स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारकांची चित्रे काढणे शिकवण्याचे ठरवले. या थीमला भारताभिमान असे नाव दिले. डोळा, कान, नाक, चेहरा, ओठ असे चेहर्‍याचे एक एक भाग काढण्यासाठी अक्षरश: महिना-महिना प्रशिक्षण चालले. 15 मे रोजी त्यांनी चित्र काढण्याचे काम थांबवले. कार्यशाळेत पाचवी ते बाराव्या वर्गात शिकणार्‍या 35 मुलांनी 60 चित्रे काढली. यात भोसले घराणे, होळकर घराणे, शिंदे घराणे, वीर सावरकर, फुले, शाहू, आंबेडकर, मदर तेरेसा, महर्षी धोंडो केशव कर्वे, जयप्रकाश नारायण आदींचा समावेश आहे. या शिवाय शिवराज्याभिषेकाचे चित्र रोहित गिरी यांनी स्वत: काढले आहे.

उद्यापासून प्रदर्शन
मुलांच्या कुंचल्यातून साकारलेल्या या चित्रांचे प्रदर्शन 26 ते 30 जूनपर्यंत सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत बळवंत वाचनालयात भरवले जाणार आहे. या वेळी सर्व चित्रकार मुले त्या ठिकाणी हजर राहून या चित्रांची माहिती देतील.
प्रत्येक मुलात कलाकार
प्रत्येक मुलाला चित्रे काढता येऊ शकतात. त्यासाठी कलेचा बेस असणे किंवा जन्मजात कलेचे अंग असणे आवश्यक नाही. मुलाला आवड असेल, तर थोड्या प्रशिक्षणाने ही कला बहरात येऊ शकते. एकही मूल मार्गदर्शनाअभावी चांगला चित्रकार बनण्यापासून वंचित राहू नये,असे मला वाटते. म्हणूनच हा उपक्रम राबवतोय.
-रोहित गिरी, चित्रकार
विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे पहा पुढील स्लाईडवर...