आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगाला विलोभनीय औरंगाबाद दाखवणारे मराठी वाटाडे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनेट हा जादूचा दिवा आहे. इंटरनेटच्या माध्यमातून किती प्रचंड आणि वेगळी कामे होऊ शकतात, याची कल्पनाही करता येणार नाही. याच माध्यमाद्वारे औरंगाबाद शहरासाठी काहीतरी करावे या भावनेतून सारंग महाजन व अमोल बक्षी हे झपाटलेले तरुण एकत्र आले. सारंग हा इंटरनेट डिझायनिंग क्षेत्रातला तर अमोल हा ट्रॅव्हल कंपनीच्या माध्यमातून जगभर फिरणारा. दोघांनी त्यांचे कौशल्य पणाला लावत विदेशी पर्यटकांना औरंगाबादची माहिती देणारी
http://www.discoveraurangabad.com ही वेबसाइट तयार केली. दौलताबाद, वेरुळसह शहराबद्दल सर्वच माहिती देणार्‍या अनेक वेबसाइट आहेत. पण या साइटवर पर्यटनस्थळ कसे पहावे याचे गोष्टीरूपात मार्गदर्शन करण्यात आले आहे. दौलताबादचा देवगिरी किल्ला कोणत्या क्रमाने पाहावा, याचे सुंदर छायाचित्रांसह वर्णन करण्यात आले आहे. अतिशय सोपे अन् सुटसुटीत ले-आऊट असलेली ही साइट पाहून आपण तिच्या प्रेमात पडलो नाही तर नवलच.
सुंदर छायाचित्रांचे आकर्षण
आपण आपले घर जसे सजवतो तशीच औरंगाबादची माहिती देणारी ही साइट सारंग व अमोल यांनी सजवली आहे. दौलताबाद, वेरुळ, मकबरा, पानचक्की यंसह औरंगाबादचे रस्ते, इथे काय खायला चांगले मिळते, शहराचे हवामान, भोवतालच्या टेकड्यांवरून रात्रीच्या वेळी दिसणारे शहराचे विहंगम दृश्य या साइटवर पाहायला मिळते. एकूण चाळीस पानांची ही साइट पाहणारी प्रत्येक व्यक्ती ती तयार करणार्‍यांची कल्पकता अन् सौंदर्यदृष्टीचे कौतुक केल्याशिवाय राहत नाही.
गुगलची शाबासकी मिळाली
कोणतीही वेबसाइट तयार करून आपण इंटरनेटवर टाकली की, जगभरातील सर्च इंजिन्स तुमच्या नकळत ती तपासतात. गुगल सर्च इंजिन यात आघाडीवर आहे. सारंग व अमोल यांनी तयार केलेली साइट गुगलने तपासली अन् त्यांना बेस्ट वेबसाइट म्हणून मानांकन दिले. त्यात मांडणी, सजावट, स्वत:च्या प्रयत्नाने मेहनत करून टाकलेली माहिती, स्वत:च्या कॅमेर्‍याने घेतलेले पर्यटनस्थळांचे फोटो या बाबी गुगलला खूप भावल्या आणि औरंगाबादच्या दोन मराठी तरुणांनी केलेली साइट जगभरात लोकप्रिय झाली.