आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MOTHERS DAY SPL: आई असो की मॉम, मातृत्व तेच !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका कडेवर पाण्याचा हंडा आणि दुसर्‍या कडेवर लेकरू.. उन्हातान्हात ये-जा करणारी धडधाकट, कणखर आई असो की उन्हाची झळही सोसावी न लागणारी मॉम किंवा मम्मी; अपत्यांसाठी वात्सल्य आणि ममतेचा झराच! काळ कितीही बदलला, तरी कधीच न आटणारा. मुला-मुलींकडून एका भेटीपलीकडे कोणतीही अपेक्षा न बाळगता त्यांचे तहहयात संगोपन करणारे आई हे पृथ्वीतलावरील एकमेव रसायन. त्याच्यापुढे विनम्र होण्याचा आजचा दिवस. तो नेहमीप्रमाणे वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा डीबी स्टारचा एक प्रयत्न.


पूर्वी घराचा उंबरठाही न ओलांडणारी स्त्री आता अंतराळातही पोहोचली आहे. या बदलांसोबत एक गोष्ट कायम राहिली ती ममता आणि मातृत्व. बदलले ते फक्त राहणीमान. फ्लॅट संस्कृती, विभक्त कुटुंब, नोकरी व आधुनिकतेचे दडपण, यामुळे माय, मम्मी ते मॉड मॉम असा प्रवास सुरू आहे. बाजारात आईची माया सोडून सर्वकाही मिळते, याची प्रचिती विशेषत: तरुणांना येत असल्याने आधुनिक वातावरणातही आईची महती कायम आहे. पूर्वी काय होते, आता काय आहे आणि सुवर्णमध्य काय, याचा मदर्स डेनिमित्त घेतलेला आढावा...