आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिकांनी टाकल्‍या माना, आता आशा रडारकडून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑगस्‍ट महिना सुरू होऊनही समाधानकारक पाऊस नसल्‍याने विदर्भ, मराठवाड्यातील शेतक-यांना आता रडार यंत्रनेकडून पावसाची अपेक्षा आहे. पहिल्‍या पावसानंतर हजारो रूपये खर्च करून शेतक-यांनी पेरण्‍या केल्‍या. मात्र पावसाअभावी पिकांनी माना टाकल्‍या आहेत. दोन महिने पोटच्‍या पोरासाखरी शेतक-यांनी पिके जोपासली. मात्र, पाऊस परतला नाही. त्‍यामुळे आता औरंगाबादमध्‍ये होत असलेल्‍या रडार यंत्रणेवर आधारित कृत्रिम पावसाकडे शेतक-यांचे डोळे लागले आहेत.
हंगाम गेला, उत्‍पादन घटले
कपाशी या प्रमुख पिकासाठी आवश्‍यक असलेला मान्‍सूनचा हंगाम गेला आहे. ऑगस्‍ट महिन्‍यात कपाशीची समाधानकारक वाढ होते. मात्र यंदा पाऊसच नसल्‍याने कपाशीला फटका बसला आहे. त्‍यामुळे उत्‍पादनात घट होईल अशी भाकीतं शेतकरी मांडत आहेत.