आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैसर्गिक पाऊस पाहून कृत्रिम पाऊस पाडणारे विमान परतले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - कृत्रिमपाऊस पाडण्याच्या प्रक्रियेदरम्यान "क्लाऊड सीडिंग'साठी आकाशात झेपावलेले विमान जालना तसेच नगर या दोन्ही जिल्ह्यांत पाऊस पडताना पाहून माघारी फिरले. नैसर्गिक पाऊस पडत असल्यामुळे विमानाला कृत्रिम पाऊस पाडण्याची गरजच पडली नाही. त्यामुळे दोन्ही वेळेला विमानाला परतावे लागले.

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला ऑगस्टपासून सुरुवात झाली. ऑगस्ट आणि ११ ऑगस्टला हा प्रयोग झाला नाही. ऑगस्ट रोजी पायलटला सुटी होती, तर ११ ऑगस्टला एअर ट्रॅफिक कंट्रोलरकडून पायलटला मुंबईला बोलावण्यात आले होते. यामध्ये पायलटला फिटनेस ट्रेनिंग तसेच इतर माहितीसाठी बोलावणे आले होते, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन संचालक सुहास दिवसे यांनी दिली.

सहादिवसांत १३६ फ्लेअर्सचा उपयोग
गेल्यासहा दिवसांत उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, अहमदनगर, सांगली, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांत कृत्रिम पावसाचा प्रयोग झाला. यामध्ये १३६ फ्लेअर्सचा उपयोग झाला. बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात काही प्रमाणात या प्रयोगाला यश मिळाले. मात्र, परभणी, लातूर जिल्ह्यात फारसे यश आलेले नाही. ऑगस्ट रोजी पाथरी तालुक्यातील बाभळगाव, कानसूर, गुंज, रामेटाकळी, लोणी या परिसरात क्लाऊड सीडिंग करण्यात आले. यामध्ये पाथरी मंडळात आणि बाभळगावमध्ये मिमी पावसाची नोंद झाली. चार ऑगस्टला एरंडगाव, शेवगावमध्ये सर्वाधिक ३३ मिमी पाऊस झाला. सात ऑगस्टलाच तुळजापूर मंडळात क्लाऊड सीडिंग केल्यानंतर सर्वाधिक १८ मिमी पाऊस झाला आहे, तर सोलापूर आणि पुण्यात हा प्रयोग फसला.

सी डॉपलर रडारचा वापर
गुरुवारीदाखल झालेल्या सी डॉपलर रडारच्या उभारणीचे काम सुरूच होते. बुधवारी ते कार्यान्वित झाले आहे. त्यानुसार बुधवारी इमेजेस मिळण्यास सुरुवातही झाली. या रडारद्वारेच ढगांतील आर्द्रता तपासली जाणार आहे. बुधवारी नैसर्गिक पाऊस पडत असल्याने जालन्याहून विमान औरंगाबादला परतले. नंतर नगरमध्ये क्लाऊड सीडिंगसाठी गेले असता तेथेही पाऊस सुरू असल्याने परतले.

नैसर्गिक पावसात प्रयोग नाही
कृत्रिमपावसासाठी क्लाऊड सीडिंग पाऊस पडत नसेल तरच केले जाते. नैसर्गिक पाऊस पडत असताना त्यामध्ये हस्तक्षेप केला जात नाही. आता रडार कार्यान्वित झाले आहे. त्यामुळे त्याच्या इमेजेसच्या माध्यमातून पावसाची अचूकता मिळेल. सुहासदिवसे, संचालक, आपत्ती व्यवस्थापन