आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादमध्‍ये कृत्रिम पावसाचा प्रयोग लांबणीवर; साहित्‍यच पोहोचले नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कृत्रिम पावसासाठी शहरात यंत्रणात उभारण्‍यात आली आहे. मात्र, यासाठी यासाठी लागणारे साहित्‍य अद्यापही औरंगाबादमध्‍ये पोहोचले नाही. त्‍यामुळे हा प्रयोग लांबणीवर पडणार असल्‍याचे संकेत मिळाले आहेत.
काही दिवसांपासून शहरात वारे वाहत होते. मात्र, प्रयोगावर वाऱ्याचा परिणाम होणार नाही, असे दिवसे यांनी म्हटले आहे. आपल्याकडे १० नॉटिकल मैलपर्यंत वारे असले तरी त्याचा परिणाम जाणवत नाही. यासाठी पाच जणांचे पथक शहरात आलेले आहे. त्यात पायलट, को-पायलट, रडार तंत्रज्ञ आहेत. मात्र, यासाठी लागणारे साहित्‍य अद्याप शहरात पोहोचले नाही.
असा राबवणार प्रयोग :
एअर क्राप्टच्या माध्यमातून क्लाऊड शेडींग करण्यात येईल. ढगांची उंची साधारण तीन ते चार कि.मी. असते. हे विमान ढगातून जाते, अशी माहिती कन्सल्टंट आर.जी. शर्म यांनी दिली. ते म्हणाले, विमानाला २४ फ्लेअर (नळकांड्या) आहेत. त्याद्वारे ढगांत सोडीयम आयोडाईटच्या माध्यमातून फवारणी केली जाईल. त्यामुळे ढगांत आद्रता निर्माण होऊन त्याचे पाण्यात रुपांतर होईल. गुरुत्वाकर्षणामुळे पाण्याचे हे थेंब खाली येतील. त्यासाठी पंधरा मिनिटे ते साधारण अर्धा तासाचा वेळ पाऊस पडण्यासाठी लागू शकतो. विमानातील रडारच्या माध्यमातून ढग असतील त्या भागात हा प्रयोग राबवला जाईल. साधारण तासभर विमानाद्वारे हा प्रयोग केला जाईल.

येवल्यात ढगांचा दगा
नाशिक जिल्ह्यात येवला तालुक्यातील सायगाव येथे मुंबईच्या एका संस्थेने कृत्रिम पावसासाठी यंत्रणा सज्ज ठेवली, परंतु वातावरण अनुकूल नसल्याने हा प्रयोग यशस्वी होऊ शकला नाही. बाष्पयुक्त ढग तयार न झाल्याने चाचणी अपयशी ठरली.

ढगाळ वातावरण नसल्याने अडथळा
औरंगाबादसह मराठवाड्यात सध्या तरी ढगाळ वातावरण नाही. ओरिसातील चक्रीवादळाचा परिणाम मराठवाड्यात पाऊस पडण्यासाठी होईल अशी स्थिती सध्या तरी नाही. त्यामुळे या प्रयोगासाठी पोषक वातावरण सध्या नाही.
श्रीनिवास औंधकर, हवामानतज्ज्ञ.