आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कला महोत्सवात अडीचशे कलाकारांचा नृत्याविष्कार, सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- कलाग्राम येथे 13 ते 15 फेब्रुवारी दरम्यान कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी थाटात पार पडले. या महोत्सवामुळे शहरवासीयांना विविध राज्यांतील संस्कृतीचे दर्शन होणार आहे. जम्मू-काश्मीर, छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, श्रीनगर, मध्य प्रदेश, लडाख यासह इतर राज्यांतील २५० कलाकार नृत्याविष्कार सादर करणार आहेत. यासदंर्भात ‘दिव्य मराठी’ने प्रत्येक राज्यातील कलाकारांसोबत संवाद साधून त्यांच्या नृत्य आणि संस्कृतीविषयी जाणून घेतले.
सांस्कृतिक कार्य संचालनालयांतर्गत दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक क्षेत्र नागपूर, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि औरंगाबाद जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधून पहाडी ग्रुपचे सय्यद तारिक परदेशी, छक्री ग्रुपच्या हसीना अख्तर, भांडपत्र ग्रुपचे लीडर गुलाम मोहंमद भट, गितडू ग्रुपचे (डोगरी) राम दत्ता, सय्यद ग्रुपचे दलिराम, लडाखी कल्चरल ग्रुपचे तोंडूप दोरजे, मोहन इस्माईल वीर ग्रुपचे अब्दुल रशीद, कोटू डान्स ग्रुपचे भद्रुवाईचे किशोर कुमार तसेच गोजरी ग्रुपचे कौशल नसीम, काश्मीर रूफ डान्सचे शुगुप्ता विविध कलानृत्ये सादर करणार आहेत. याबरोबरच मध्य प्रदेश, श्रीनगर, महाराष्ट्रातूनही कलाकार संस्कृती सादर करणार आहेत.
मध्य प्रदेशचा ग्रुप : "बैगा नृत्यक दल धुरकुटा' हे लोकनृत्य सादर करणार आहे. यामध्ये नवरीच्या भावाचे स्वागत करण्यासाठी खोट्या पलंगाचा हत्ती तयार करून स्वागत केले जाते. यात नगाडा, मांदर, टिमरी, बासुरी, हातामध्ये ठिसकी घेऊन नृत्य केले जाते. कर्मा नृत्यप्रकार शेतीचे पीक आल्यानंतर आणि एका गावाची महिला दुसरा गावाचा पुरुष असे दोघे जण नृत्य करतात. असेच घोडी पैठाई नृत्यप्रकारात महिला १० पुरुषांचे नृत्य बघायला मिळेल. -दयाराम रुठरिया, ग्रुपलीडर

सोंगी मुखवटे ग्रुप, नाशिक : महाराष्ट्रातहोळीनंतर उत्सव साजरा केला जातो. यात सोंगी मुखवटा लोकनृत्य केले जाते. ज्यामध्ये हातामध्ये काठी घेऊन नाचतात तर दोन कलाकार मिळून नृसिंहाच्या वेशात नृत्य करतात. तसेच कालभैरव, वेताळ यांचे मुखवटे घालून नृत्य केले जाते.
प्रभाकर गवळी
एमरज्ल डान्स ग्रुप : श्रीनगरातीलहा ग्रुप लोकनृत्य सादर करणार आहे. या नृत्यातून फॅशन अॅन तुमार हा नृत्यप्रकार दाखवला असून रमजान आणि लग्नाच्या समारंभात तो केला जातो. आमच्या ग्रुपमध्ये १४ मुली पुरुष संगीतकार आहेत. शुगुप्तारहेमान, ग्रुपलीडर

पहाडी ग्रुप : यातपहाडी भागात राहणाऱ्या लोकांचे जीवन नृत्याच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे. महिलांच्या पाठीवर टोपली राहणार असून ते विविध वेशभूषा करणार आहेत. यापूर्वी मुंबई, नागपूर, पंजाब, दिल्ली आदी ठिकाणी ग्रुपने लोकसंस्कृतीचे दर्शन घडवले आहे. औरंगाबादकरांना जम्मू-काश्मीरमधील पहाडी भागात राहणाऱ्या लोकांचे जीवन आणि संस्कृती कळेल. सय्यदतारिक परदेशी, जम्मू-काश्मीर

पहाडी ग्रुप : बसवकालनग्रुप कनार्टक : ढोल वाजवून भगवान शंकराची आराधना करताना ढोलुकुविता हा नृत्यप्रकार सादर केला जातो. लग्न समारंभ किंवा यात्रेत हे नृत्य सादर केले जाते. औरंगाबादकरांना कर्नाटकातील संस्कृती यातून समजणार आहे. रवीकुमार