आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निळू दामले यांना आज देणार वैद्य पुरस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - प्रख्यात पत्रकार निळू दामले यांना शुक्रवारी पत्रकारितेत मोलाच्या योगदानासाठी दिला जाणारा अरविंद आ. वैद्य स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात (शासकीय दूध डेअरीच्या मागे) सायंकाळी सहा वाजता हा सोहळा होणार आहे. निवृत्त न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाईल. अध्यक्षस्थानी ‘दिव्य मराठी’चे स्टेट एडिटर अभिलाष खांडेकर राहणार आहेत. दामले यांचा आंतरराष्ट्रीय घडामोडी विशेषत: अफगाणिस्तान, पश्चिम आशियाई देशांतील राजकारण, धार्मिकता याविषयी गाढा अभ्यास आहे. त्यांची ‘इस्तंबूल ते कैरो’, ‘अवघड अफगाणिस्तान’, ‘जेरुसलेम’, ‘माणूस आणि झाड’ ही पुस्तके गाजली आहेत.