आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादकरांच्या खांद्यावरच माझा जनाजा निघावा, असदुद्दीन ओवेसींनी व्यक्त केली इच्छा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - 'माझे या सुफी संतांच्या भूमीवर प्रेम आहे. या शहरावर माझे प्रेम आहे. या शहराला मी कधीही विसरू शकत नाही, त्यामुळे औरंगाबादच्या भूमीतच मृत्यू यावा आणि तुमच्या खांद्यावर माझा जनाजा (पार्थीव) निघावा, हीच माझी इच्छा आहे" असे भावपूर्ण उद्गार एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद येथील सभेत काढले.
काँग्रेसने आतापर्यंत शिवसेना,भाजपची भीती दाखवत मतांसाठी मुस्लिमांचा वापर केला आहे. त्यांच्या दबावाला बळी पडू नका. सर्वांनी एकत्र येऊन आपल्या हक्कासाठी लढा द्यावा. मुसलमान कुणाची गुलामगिरी करणार नाही. एमआयएम तुमच्या हक्कासाठी लढेल. यासाठी त्याचा उदय झाला असून एमआयएमच्याच उमेदवारांना निवडून द्या, असे भावनिक आवाहनही ओवेसी यांनी केले.
महापालिका निवडणुकीतील एमआयएम उमदेवारांच्या प्रचारासाठी आमखास मैदानावर गुरुवारी रात्री ओवेसी यांची जाहीर सभा झाली. या वेळी ओवेसींनी मुस्लिम बांधवांना एकत्र येण्याचे आवाहन केले. ओवेसी यांनी एक तासाच्या भाषणात सांगितले की, विधानसभेत जसे सर्वजण एकत्र आले होते त्याच ताकदीने आता एकत्र येण्याची गरज आहे. महापालिकेत एमआयएमची सत्ता आल्यास महापौर, स्थायी समितीच्या सभापतिपदी दलित समाजाच्या प्रतिनिधीला संधी देऊ. शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि पाणीप्रश्नाला महापालिका सत्तेतील शिवसेना, भाजपच जबाबदार आहे, अशी टीका करून एमआयएमची सत्ता आल्यास मालमत्ता कर, पाणीपट्टी कमी करू, असे आश्वासनही ओवेसी यांनी दिले. शहरातील ११३ वॉर्डांपैकी ६२ वॉर्डांत ड्रेनेजलाइन नाही. ७३ वॉर्डांत पाण्याची समस्या आहे.
आतालोकसभेसाठीही उमेदवार
काँग्रेसचेनेते आम्हाला वांद्र्यात एमआयएमचा उमेदवार देऊ नका, असे सांगत होते. आम्ही लोकसभेत उमेदवार दिले नव्हते, तर ते आम्हाला असे का सांगत होते? मात्र आता आगामी लोकसभा निवडणुकीतही उमेदवार देऊ, अशी घोषणा त्यांनी केली. एमआयएम राजकीय पक्ष आहे. आम्ही लढणारच. आम्ही पराभूत झालो तरी त्याची चिंता नाही, असेही ओवेसी म्हणाले. या वेळी व्यासपीठावर आमदार इम्तियाज जलील, जफर हुसेन, जावेद कुरेशी, मुकुंद सोनवणे, डॉ. गफ्फार कादरी यांच्यासह सर्व उमदेवार उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनाही नोटीस द्या
मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, गुलाम नबी आझाद हे शहरात आल्यानंतर त्यांना नोटिसा देणार का? मला वारंवार नोटिसा दिल्या जातात. माझा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केला जातो. एकाच पक्षाच्या नेत्याला नोटिसा का दिल्या जातात? मी या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे, असेही ओवेसींनी जाहीर सभेत सांगितले.
पुढील स्लाईडवर पाहा, ओवेसींच्या सभेचे इतर काही फोटो...