आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसेगावात लोकसहभागातून साकारले कोरफड पार्क

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासूर स्टेशन - आसेगाव जिल्हा परिषद प्रशालेत लोकसहभागातून कोरफड पार्क साकारले आहे. हिरवळ पट्टे, पक्षी थांबा, वृक्षारोपणासारखे तसेच त्यांच्या संगोपन-संवर्धनासाठी गांडूळ खत प्रकल्प, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, संगणक कक्ष, विज्ञानाची प्रयोगशाळा, साने गुरुजी वाचनालय, किचन शेड, अध्ययन आेटेदेखील केले आहेत. या सर्व विकासात्मक कामांची गंगापूरचे गटविकास अधिकारी आर. के. बागडे यांनी सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. या वेळी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिली. शाळेने दैनंदिन अध्यापनात सामान्य ज्ञानाच्या समावेशाबाबत कौतुक केले. या वेळी ग्रामविकास अधिकारी वाय. बी. कांबळे, अब्बास शेख यांची उपस्थिती होती.