आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashitosh News In Marathi, AAP, Narendra Modi, Divya Marathi, BJP

मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळातील गुन्हेगारी संपवावी - आशुतोष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - नरेंद्र मोदींनी देशातील राजकारणामधील गुन्हेगारी संपवण्याची भाषा केली आहे. मात्र, गुजरातमधील त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांवरच गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळातील भ्रष्टाचार करणार्‍या आणि गुन्हेगार मंत्र्यांवर अगोदर कारवाई करावी, अशी टीका आपचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष यांनी केली. ते गुरुवारी आपच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.


आशुतोष सध्या मराठवाड्याच्या दौर्‍यावर आहेत. त्यांनी जालना जिल्ह्यात आपचे उमेदवार दयानंद म्हस्के यांच्यासाठी सभा घेतली. पंधरा दिवसांनंतर जालन्यामध्ये पाणी येत असेल तर दानवे यांनी गेल्या पंधरा वर्षांत काय काम केले, असा सवाल त्यांनी केला. मोदींवर टीका करताना आशुतोष म्हणाले, गुजरातचे मुख्यमंत्री विकासाचे आकडे सांगत आहेत. मात्र, गुजरात सरकारवर 1 लाख 75 हजार कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या डोक्यावर 24 हजार रुपये कर्ज आहे. मात्र, खोटे आकडे सांगून विकासाच्या फक्त गप्पा केल्या जात आहेत. गुजरातमध्ये कुपोषण, बेरोजगारी आणि सर्वाधिक भ्रष्टाचार आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील दोन जणांवर घोटाळे केल्याचा आरोप आहे. मात्र, मोदी त्यांच्यावर कारवाई करत नाहीत.


आपच्या उमेदवारावर हल्ला होऊ शकतो
आपच्या नांदेड येथील उमेदवारावर गुरुवारी हल्ला झाला. दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. हा हल्ला निंदाजनक असून प्रशासन सत्ताधार्‍याच्या दबावाखाली काम करत आहे. त्यामुळे हल्लेखोरावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. औरंगाबादचे आपचे उमेदवार सुभाष लोमटे यांच्यावरदेखील हल्ला होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने सतर्कता दाखवण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या पत्रकार परिषदेला दयानंद म्हस्के, हरमित सिंह, अण्णा खंदारे, मनीषा चौधरी यांची उपस्थिती होती.