आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Ashok Chavan News In Marathi, Aurangabad, Divyamarathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माहिती अधिकाराने मंत्र्यांवर दबाव, तोटेच अधिक : अशोक चव्हाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- माहिती अधिकाराचे फायदे आहेत तसे तोटेही आहेत. तोटे जास्त झाल्यामुळे अधिकारी, मंत्री निर्णय घेताना दबावाखाली असतात, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. येथे आयोजित काँग्रेस सेवा दलाच्या विभागीय मेळाव्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी हे भाष्य केले.

लोकहितवादी निर्णय कायद्याच्या पुढे जाऊन घ्यायचे असतात, पण माहिती अधिकारामुळे ते शक्य होत नाही. सचिवाने सही करून आणलेल्या फाइलवर पुन्हा सहीच करायची असेल तर सत्ता काय कामाची, असा प्रश्न उपस्थित करून माणुसकीच्या दृष्टिकोनातून घेतलेल्या निर्णयाला संरक्षण हवे, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले.

पक्षाने आदेश दिला तर लोकसभा लढवणार
काँग्रेस पक्षाने आदेश दिला तर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे चव्हाण म्हणाले. अन्यथा विधानसभाच लढवावी लागेल, असेही त्यांनी नमूद केले.
आदर्श घोटाळ्यातील नावामुळे अशोक चव्हाण दिल्लीच्या वाटेवर असल्याची चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांत होती. कार्यक्रमानंतर पत्रकारांनी त्यांना छेडले असता पक्ष काय ते ठरवेल, असे सांगून त्यांनी विषय टाळला. लोकसभा निवडणुकीची काही जबाबदारी पक्षाने सोपवली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
माहिती अधिकाराबाबत चव्हाण म्हणाले, कधी कधी कायद्याच्या पुढे जावून निर्णय घ्यावे लागतात. मात्र माहिती अधिकारात तो निर्णय जाहीर होईल, अशी भीती आता सर्वांच्याच मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे मंत्री निर्णयच घेत नाहीत. ह्युमन इंटरेस्ट असलेल्या प्रकरणांत कायद्याच्या पुढे जावून निर्णय घ्यायचे असतात. अशा निर्णयांना माहिती अधिकारातून संरक्षण असावे. माहिती अधिकाराचा पुनविर्चार करण्याची गरज आहे का, यावर मात्र त्यांनी नकारार्थी उत्तर दिले.