आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हवामान खाते अाणि सरकार बेभरवशाचेच, कृत्रिम पावसावरून चव्हाणांची मंत्र्यावर टीका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- हवामानखाते सरकार दोघेही बेभरवशाचे आहेत, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. हवामान खात्याचे पावसाचे अंदाज चुकत आहेत. राज्य सरकार फक्त आश्वासने देत आहे. अंमलबजावणी मात्र नाही. सत्तेत राहून शिवसेना भाजपच्या निर्णयाविरोधात भासवत भाजपला आपण पर्याय असल्याचे सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

शनिवारी चव्हाण यांनी औरंगाबादेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, भाजपच्या निर्णयांवर शिवसेना टीका करत असली तरी दाेघेही एकाच नाण्याच्या बाजू आहेत. आम्ही त्यांचा हा दुटप्पी चेहरा उघडा करू. रवींद्र वायकरच्या घोटाळ्यापासून त्याची सुरुवात केली. शिवसेनेत स्वाभिमान शिल्लक असेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असे चव्हाण म्हणाले.

जिल्हा परिषद इतर स्थानिक निवडणुकीत आघाडीबाबतच्या निर्णयाचे अधिकार स्थानिक पातळीवर दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीशी आघाडीचा ठोस निर्णय घेतलेला नाही, असेही ते म्हणाले.

अंमलबजावणीचा सीएमकडे अभाव
एक माजी मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या कार्यपद्धतीकडे कसे पाहता, असे विचारल्यावर चव्हाण म्हणाले, ते लाेकांनी ठरवायचे अाहे. मात्र त्यांच्या निर्णयात प्रशासकीय अंमलबजावणीचा अभाव दिसताे. स्वत: मुख्यमंत्रीच अधिकारी ऐकत नाहीत, असे जाहीरपणे सांगतात. त्यामुळे आता खडसेंच्या आरोपाचा ते कसा प्रतिकार करतात हे पण मलाही पाहायचे अाहे.
बातम्या आणखी आहेत...