आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ashtavinayak Mandal Established Lalbagacha Raja Ganesh

अष्टविनायक मंडळाने स्थापन केला"लालबागचा राजा'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राजाबाजार जाधवमंडी बांबू मार्केटमध्ये श्री अष्टविनायक गणेश मंडळात मंुबईच्या "लालबागचा राजा' गणरायाची प्रतिकृती असलेल्या १४ फुटी गणपती बाप्पाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही जाधवमंडी बांबू मार्केटमध्ये श्री अष्टविनायक गणेश मंडळाने लालबागचा गणपती मुंबईहून आणला आहे. १४ फुटी उंची असलेल्या गणरायाचे अनोखे रूप आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. गणरायाच्या रूपात या वर्षी गणरायाच्या डोक्यावर शेषनाग आणि पायाजवळ मोरांची जोडी असे देखणे रूप गणरायाचे आहे. गणपतीसमोर हाेमहवन आणि फुलांनी सजावट करण्यात आली आहे. दरवर्षी विविध रूपांत गणपती बसविण्यात येतो. यंदाच्या लालबागच्या गणरायाच्या चेहऱ्यावर आनंद, हर्ष, उल्हास दिसून येत आहे. मंडळाचे अध्यक्ष रेवण सोनवणे, उपाध्यक्ष अजित मिसाळ, सचिव अरविंद चव्हाण, बाळू सोनवणे, तुषार रावळ, ज्ञानेश्वर चव्हाण, मयूर टाक, नितीन सोनवणे, विलास चव्हाण, श्रीकांत चव्हाण, विकी अब्बड, विष्णू क्षीरसागर गणेशाेत्सवात परिश्रम घेत आहेत.