आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७५ जणांचा जीव वाचवणाऱ्या अश्विनीच्या धाडसाचे कौतुक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - देवानगरीतील अक्षय गार्डनमधील मीटरमध्ये शॉर्टसर्कीट होऊन आग लागली होती. हा प्रकार पाणी भरण्यासाठी तळ मजल्यावर आलेल्या अश्विनी मेहूणकर हिच्या निदर्शनास आला. तिने तातडीने बादलीत रेती भरली आणि आगीच्या ठिकाणी फेकून आग आटोक्यात आणली. तिने दाखवलेली समयसूचकता आणि धाडसामुळे अपार्टमेंटमधील एकूण ७५ जणांचे प्राण वाचले. सोसायटीमधील रहिवाशांनी तिचा गौरव केला. ही घटना आठ जानेवारीला घडली होती. अश्विनी ही सध्या जेएनईसी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे.