आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एशियन सिटी केअर हॉस्पिटल उद्यापासून सेवेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - उस्मानपुरा येथील एशियन सिटी केअर सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा १६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या वेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे उपस्थित राहतील. शहरात एकाच छताखाली अनेक सेवा देणारे रुग्णालय असेल, असे रुग्णालय प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
हृदयरोग, मेंदू आणि मणक्याच्या दुर्बिणीद्वारे होणाऱ्या शस्त्रक्रिया, किडनी तज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, मेंदूविकारतज्ज्ञ कर्करोग अशा विविध तज्ज्ञांची पूर्णवेळ उपस्थिती असेल. या ठिकाणी दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. नवजात शिशूंसाठी अतिदक्षता विभागही येथे उपलब्ध आहे. अपघातातील जखमींसाठी परिपूर्ण ट्रॉमा केअर सेंटर म्हणून रुग्णालय सेवेत उपलब्ध होत आहे. अत्याधुनिक आणि परिपूर्ण यंत्रसामग्रीने सज्ज असलेले हे २४ खाटांचे रुग्णालय आहे.

उद्घाटन सोहळ्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, इम्तियाज जलील, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, राजेंद्र दर्डा, राजेश टोपे, सुभाष झांबड, संदिपान भुमरे, नारायण कुचे, प्रशांत बंब, हर्षवर्धन जाधव, भाऊसाहेब चिकटगावकर, राजू भोळे, चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, किशनचंद तनवाणी, अंबादास दानवे, कल्याण काळे यांची प्रमुख उपस्थिती राहील, तर पोलिस आयुक्त अमितेशकुमार, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, महापौर त्र्यंबक तुपे, मनपा आयुक्त प्रकाश महाजन, आरोग्य उपसंचालक डॉ. रविकिरण चव्हाण, उपमहापौर प्रमोद राठोड, आरोग्य सहसंचालक डॉ. सुरेश बारपांडे, घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, डॉ. मंगला बोरकर, डॉ. एस.एच. तालिब यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.