आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डांबरी रस्त्याची दोन वर्षांत झाली चाळणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - कोट्यवधी रुपये खर्च करून बनवलेल्या डांबरी रस्त्यांची दोन वर्षांतच चाळणी झाल्याचे चित्र तालुक्यात ठिकठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे या खडतर रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाप्रति रोष व्यक्त होत आहे.
राज्य शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून अनेक डांबरी रस्ते सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत २०१४-१५ मध्ये बनवण्यात आले. वर्ष उलटत नाही, तोच महामार्गासह गावागावांना जोडणाऱ्या रस्त्यांची वाट लागली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यातून वाहने चालवताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. रिमझिम पावसातच रस्ते उखडल्याने कंत्राटदारांचे पितळ उघडे पडले आहे. त्यामुळे वर्षभरातच रस्त्यांची चाळणी होते कशी, असा प्रश्न उपस्थित करून कामाची चौकशीची मागणी होत आहे.

या डांबरी रस्त्यांची लागली "वाट'
फुलंब्री महामार्ग, गदाना-सुलतानपूर -गणोरीफाटा, वेरूळ-कसाबखेड फाटा, काटशेवरी फाटा ते राजेराव टाकळी, सुलतानापूर ते भांडेगाव, सुलतानपूर ते बडोद, सुलतानपूर ते कनकशीळ, ममनापूर ते सोनखेडा, खिर्डी ते खुलताबाद, सोनखेडा ते खिर्डी, सराई ते सालूखेडा, म्हैसमाळ ते खुलताबाद, टाकळी ते बोडखा यासह अनेक रस्ते खड्डेमय झाले असून रस्ता खड्ड्यात की खड्ड्यात रस्ता हेच कळेनासे झाले आहे.

रस्ते, त्यावरील खर्च
महामार्ग २११ ते संत जनार्दन स्वामी महाविद्यालय : ७० लाख.
वेरूळ महामार्ग २११ ते पार्श्वनाथ मंदिर : ३३ लाख.
गल्लेबोरगाव ते रेल : ४७ लाख.
बोरगाव ते पळसगाव : २० लाख.
वेरूळ ते माटरगाव : १२ लाख.
कनकशीळ ते रेल : ३७ लाख ९६ हजार.
आजमपूर फाटा ते पळसगाव ७० लाख ३९ हजार.