आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assault Complain Against Madhya Pradesh Industralist

मध्य प्रदेशच्या उद्योजकाविरूध्द अत्याचाराची तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील एका थ्रीस्टार हॉटेलमध्ये काम करणाऱ्या २५ वर्षांच्या तरुणीने मध्य प्रदेशातील उद्योजक वैभव वैष्णव (३५) यांच्याविरुद्ध अत्याचार केल्याची तक्रार सिटी चौक पोलिस ठाण्यात दिली, अशी माहिती सिटी चौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक नागनाथ कोडे यांनी दिली.
तरुणीच्या वडिलांचे दीड वर्षापूर्वी निधन झाले. त्यामुळे ती नोकरीच्या शोधात होती. दरम्यान, तिला अहमदाबाद येथील एका कॉल सेंटरमध्ये नोकरी लागली. फेसबुकवरून तिची ओळख एस कुमार ग्रुपचे (कपड्यांचे उद्योजक) वैष्णव यांच्याशी झाली. त्यांनी नोकरी देण्यासाठी मध्य प्रदेशातील इंदूर येथे बोलावून घेतले. भेटीगाठीनंतर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केले. मात्र आधीच लग्न झालेले असल्याने त्यांनी तिच्याशी लग्न केले नाही. दोघांमध्ये खटके उडाले आणि ती औरंगाबादला परत आली. उपजीविकेसाठी ती शहरातील एका थ्रीस्टार हाॅटेलमध्ये नोकरी करू लागली. १७ सप्टेंबर रोजी व्यवसायाच्या अनुषंगाने वैष्णव औरंगाबादला आले. त्यांनी तिला फोन करून बोलावून घेतले आणि कारमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. आपण लग्नाचा विषय छेडला असता, माझे लग्न दुसरीकडे झाले आहे, मी आता तुझ्यासोबत लग्न करू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. तरुणीने २१ सप्टेंबर रोजी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेत त्यांच्याकडे तक्रार केली. आयुक्तांनी चौकशीचे आदेश देत महिला अत्याचारविरोधी पथकाच्या सहायक पोलिस निरीक्षक दीपाली निकम यांच्याकडे प्रकरण सोपवले. मंगळवारी रात्री उशिरा सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.