आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Assault On Rashtrawadi Activist Pasha In Aurangabad

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पाशा यांच्यावर प्राणघातक हल्ला,तक्रारींकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने वाढली हिंमत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जागेच्या वादावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, आझाद अली एज्युकेशन ट्रस्टचे सर्वेसर्वा खान साजिद पाशा सलिमोद्दीन खान (४१) आणि त्यांच्या आई सुरय्या सलीम खान (६१) यांच्यावर शुक्रवारी १०.३० वाजेच्या सुमारास अब्दुल हमीद खान यांच्यासह सात जणांनी प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोरांनी हल्ल्यासाठी लोखंडी रॉड, हॉकी स्टिक बॅटचा वापर केला. या हल्ल्यात पाशा यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले असून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने १९ टाके पडले, तर त्यांच्या आईचा उजवा हात फ्रॅक्चर झाला आहे. दोघांवर घाटीत उपचार सुरू आहेत.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खान साजिद पाशा आणि अब्दुल हमीद खान यांच्यात पाशा यांच्या घराशेजारील तीन हजार स्क्वेअर फूट जागेचा वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास अब्दुल हमीद खान यांनी त्या जागेवर बोअर खोदण्यासाठी गाडी बोलावली होती. बोअर खोदण्याचे काम सुरू करीत असताना खान साजिद पाशा यांनी बोअर खोदणाऱ्या कामगारांना या जागेचा वाद सुरू असून बोअर खोदायचा नाही, असे सांगितले. तेव्हा बोअर खोदणाऱ्या व्यक्तींनी हा वाद आम्हाला माहीत नव्हता. आम्ही बोअर खोदणार नाही, असे सांगितले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी...