आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमआयएम नगरसेवकाला कपडे फाटेपर्यंत मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ‘महापालिकेचे अधिकारी गेंड्याच्या कातडीचे’ असा शब्दप्रयोग करणारे एमआयएमचे नगरसेवक शेख जफर (बिल्डर) यांना विरोधी पक्षनेत्याच्या दालनात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली. जफर तसेच त्यांना मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचेही कपडे फाटले. दुपारी चार वाजता हा प्रकार घडला. विशेष म्हणजे जफर बिल्डर यांना मारहाण करणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही व्यवसायाने बिल्डर्स असल्याचे समजते. ही हाणामारी होत असताना एमआयएम नगरसेवक अज्जू नाईकवाडी घटनास्थळी होते.
एमआयएमचे नगरसेवक विरोधी पक्षनेते अय्युब जहागीरदार यांच्या दालनातील मिनी चेंबरमध्ये बसले होते. चिश्तिया कॉलनीचे नगरसेवक अज्जू नाईकवाडी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कपिल (बिल्डर), त्यांचा साथीदार गंभीर विषयावर चर्चा करत होते. इंदिरानगर बायजीपुऱ्याचे (उत्तर) एमआयएमचे नगरसेवक जफरही त्याच वेळी तेथे आले. जफर यांनी नाईकवाडी यांना आजकाल तुमची खूप दादागिरी चालली, असे वक्तव्य केले. त्याला कपिल आणि त्याच्या साथीदाराने आक्षेप घेतला. कोणाला उद्देशून बोललात? असा प्रश्न त्यांनी केला. यावरून वाद झाला अन् कपिल त्याच्या साथीदाराने जफर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. जफर यांनीही प्रत्युत्तर दिले. यात कपिलचे कपडे फाटले. त्यांनीही जफर यांचे कपडे फाडले. दोघांनीही फोनवरून आपल्या कार्यकर्त्यांना मनपात बोलावले, परंतु कोणी आले नाही. सायंकाळी जफर कपिल यांनी सिटी चौक ठाणे गाठले होते.
बातम्या आणखी आहेत...