आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज भरण्यासाठी आज मिळणार तीनच तास, निम्मे अर्ज अजूनही दाखल झाले नाहीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- 15 ऑक्टोबरला होणा-या विधानसभेच्या निवडणुकीत उडी घेण्याचा शनिवार हा शेवटचा दिवस आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 अशा चारच तासांत अर्ज भरता येतील. आतापर्यंत विविध राजकीय पक्षांबरोबरच अपक्षांनीही मोठ्या प्रमाणावर अर्ज ताब्यात घेतले आहेत. त्यातील निम्मेही अर्ज अद्याप दाखल झालेले नाहीत.
एकट्या औरंगाबाद मध्य मतदारसंघात 103 जणांनी 217 अर्ज ताब्यात घेतले होते. यातील किती अर्ज उद्या दाखल होतात अन् किती जण घरीच ठेवणार हे उद्याच समजू शकेल. उमेदवारी अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. अर्ज ताब्यात घेण्याची प्रक्रिया शनिवारी दुपारी 3 वाजता थांबल्यानंतर सोमवारी दाखल अर्जांची छाननी होईल. मंगळवारी उमेदवारांना चिन्हांचे वाटप केले जाईल. त्यानंतर बुधवारी म्हणजेच 1 ऑक्टोबरला दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येतील. अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल.