आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मतदारांच्या भेटीगाठींवर उमेदवार देताहेत जोर, पूर्व मतदारसंघातील लढत सर्वाधिक चुरशीची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातील तीन मतदारसंघांपैकी सर्वाधिक चुरशीची लढत पूर्वमध्ये पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे राजेंद्र दर्डा, भाजपचे अतुल सावे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जुबेर मोतीवाला, शिवसेनेच्या महापौर कला ओझा, भाकपचे भालचंद्र कांगो, मनसेचे सुमीत खांबेकर, अपक्ष उत्तमसिंह पवार, एमआयएमचे डॉ. गफार कादरी, बीएसपीचे महेंद्र सोनवणे, सपाचे मिर्झा निसार बेग आदी उमेदवारांत लढत होणार आहे.
उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उमदेवारांचे पहिले दोन दिवस बैठका आणि नियोजनात गेले. यातूनही वेळ काढून काहींनी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटी घेतल्या. युती असताना भाजप तीनपैकी केवळ एक जागा लढवत होता. मात्र युती तुटल्यानंतर उरलेल्या दोन्ही जागांवर पक्षाला उमेदवार आयात करावे लागले. त्यामुळे पहिल्या दिवशी पक्षाकडून फक्त बैठकीवर जोर देण्यात आला. भाजपतर्फे औरंगाबाद मध्य आणि पश्चिम मतदारसंघात नवीन उमेदवार देण्यात आले आहेत. तनवाणींसाठी गुलमंडीवर बैठक घेण्यात आली होती. त्यांच्या प्रचारासाठी कॉर्नर बैठका प्रचारसभा तसेच प्रचारासंदर्भातले नियोजन करण्यात आले. त्यानंतर मधुकर सावंत, अतुल सावे यांच्या कार्यालयताही बैठकांमधून नियोजन करण्यात आले. बैठकीनंतर तनवाणी यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या, तर सावेंनी पुंडलिकनगरचा भाग आणि बजरंग चौक सिडको परिसरात मतदारांच्या भेटी घेतल्या. राजेंद्र दर्डा, जुबेर मोतीवाला, डॉ. कांगो, सुमीत खांबेकर यांनीही प्रचाराचे नियोजन करतानाच मतदारांच्या भेटींवर जोर दिला. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उत्तमसिंह पवार पूर्वमधून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात जवळपास दोन लाख ५५ हजार मतदार आहेत. आमदार राजेंद्र दर्डा यांनी काँग्रेसची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली होती.