औरंगाबाद- विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्र उतरल्यामुळे उमेदवारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या वतीने मतदान करून घेण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. त्यामुळे शहरातील मंडप, केटरर्स आणि रिक्षांना प्रचंड मागणी वाढली आहे. बूथवर कार्यकर्त्यांसाठी मंडप आणि टेबल खुर्च्यांची बुकिंग हाऊसफुल्ल झाली आहे. सर्वच पक्षांनी कार्यकर्त्यांचे बूथनिहाय नियोजन केल्यामुळे मतदान करून घेण्यासाठी रस्सीखेच होणार आहे.
शहरातल्या तीन मतदारसंघांत 850 पेक्षा अधिक बूथ आहेत. त्यामुळे प्रत्येक बूथवर सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आणि मतदान प्रतिनिधी असणार आहेत. त्यांना लागणारे मंडप, टेबल, खुर्च्यांसाठी दोन दिवसांपूर्वीच बुकिंग करण्यात आली आहे. एका मंडपासाठी 800 ते 1000 रुपये इतका खर्च येतो, तर एक खुर्ची पाच रुपये, टेबल 15 रुपये किमतीने भाड्याने मिळत आहे. शहरात जवळपास 120 मंडप डेकोरेटर्स असून मागणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मंडप आणि टेबल, खुर्चीचा तुटवडा जाणवत आहे.
कार्यकर्त्यांना पुरवणार दिवसभर पुरीभाजी
जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी विविध पक्षांच्या वतीने प्रयत्न होणार आहेत. त्यामुळे टक्केवारी वाढणार आहे. कार्यर्त्यांची संख्या लक्षात घेता त्यांना दिवसभर पुरी भाजी, पाणी पुरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. टेकाळे कॅटरर्सचे जयराम टेकाळे यांनी सांगितले, शहरातल्या अनेक कॅटरर्सकडे आगाऊ बुकिंग झाली आहे. यापूर्वी पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांना जेवणाचे नियोजन करण्यात येत होते. मात्र मतदानाचा दिवस अतिशय व्यग्र असल्यामुळे सर्वत्र पुरीभाजीची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. मतदारांची केंद्रावर ने-आण करण्यासाठी रिक्षा मोठ्या प्रमाणात बुक झाल्याआहेत. प्रत्येक बूथवर किमान दहा रिक्षा असतील, अशी माहिती ऑटो युनियनच्या वतीने देण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्र उतरल्यामुळे उमेदवारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या वतीने मतदान करून घेण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. त्यामुळे शहरातील मंडप, केटरर्स आणि रिक्षांना प्रचंड मागणी वाढली आहे. बूथवर कार्यकर्त्यांसाठी मंडप आणि टेबल खुर्च्यांची बुकिंग हाऊसफुल्ल झाली आहे. सर्वच पक्षांनी कार्यकर्त्यांचे बूथनिहाय नियोजन केल्यामुळे मतदान करून घेण्यासाठी रस्सीखेच होणार आहे.
शहरातल्या तीन मतदारसंघांत 850 पेक्षा अधिक बूथ आहेत. त्यामुळे प्रत्येक बूथवर सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आणि मतदान प्रतिनिधी असणार आहेत. त्यांना लागणारे मंडप, टेबल, खुर्च्यांसाठी दोन दिवसांपूर्वीच बुकिंग करण्यात आली आहे. एका मंडपासाठी 800 ते 1000 रुपये इतका खर्च येतो, तर एक खुर्ची पाच रुपये, टेबल 15 रुपये किमतीने भाड्याने मिळत आहे. शहरात जवळपास 120 मंडप डेकोरेटर्स असून मागणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मंडप आणि टेबल, खुर्चीचा तुटवडा जाणवत आहे.
कार्यकर्त्यांना पुरवणार दिवसभर पुरीभाजी
जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी विविध पक्षांच्या वतीने प्रयत्न होणार आहेत. त्यामुळे टक्केवारी वाढणार आहे. कार्यर्त्यांची संख्या लक्षात घेता त्यांना दिवसभर पुरी भाजी, पाणी पुरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. टेकाळे कॅटरर्सचे जयराम टेकाळे यांनी सांिगतले, शहरातल्या अनेक कॅटरर्सकडे आगाऊ बुकिंग झाली आहे. यापूर्वी पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांना जेवणाचे नियोजन करण्यात येत होते. मात्र मतदानाचा िदवस अतिशय व्यग्र असल्यामुळे सर्वत्र पुरीभाजीची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. मतदारांची केंद्रावर ने-आण करण्यासाठी रिक्षा मोठ्या प्रमाणात बुक झाल्याआहेत. प्रत्येक बूथवर किमान दहा रिक्षा असतील, अशी माहिती ऑटो युनियनच्या वतीने देण्यात आली आहे.