आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा निवडणूक लढवणार- डॉ. भालचंद्र कांगो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील निष्क्रिय नेत्यांमुळे मराठवाड्याचा विकास थांबला आहे. रस्ते, पाणी, वीज यासारखे मूलभूत प्रश्नदेखील आतापर्यंत सोडवले गेले नाहीत. आता संघर्षाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आम्ही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत, अशी माहिती भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. भालचंद्र कांगो यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
येणा-या विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, समाजवादी पार्टी, आम आदमी पार्टी आणि इतर डाव्या विचारसरणीच्या पक्षांना एकत्र आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. याशिवाय मराठवाडा जनविकास आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन मराठवाड्याच्या विकासासाठी भरीव कार्य करणा-यांनादेखील एकत्र आणणार असल्याचे कांगो म्हणाले. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून पक्षाने आपल्याला उमेदवारी दिली आहे. मराठवाड्यातील सर्व मतदारसंघांतून आम्ही निवडणूक लढवणार आहोत.