आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दर्डांच्या रेल्वेला खैरेंचे रूळ, टॉय ट्रेनचा निधी दर्डांचा उद्धाटन मात्र खैरेंच्‍या हस्‍ते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना एकमेकांच्या कामांचे लाटण्याची ओढ सत्ताधारी-विरोधकांत सुरू आहे. मात्र, औरंगाबादेत वेगळा प्रकार घडला आहे. बाळासाहेब ठाकरे बॉटनिकल गार्डनमधील टॉय ट्रेनसाठी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डांनी ३० लाख रुपयांचा निधी दिला. त्या रेल्वेसाठी रूळ टाकण्याच्या कामाचे उद्धाटन खासदार चंद्रकांत खैरेंनी करून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. दुसरीकडे दर्डा-खैरेंमधील ह्यराजह्णकीय मैत्री सर्वांसमोर आल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दर्डा औरंगाबाद पूर्वमधून काँग्रेसकडून विधानसभा लढण्याच्या तयारीला लागले आहेत. सिडकोतील शिवसेना समर्थक मतदारांची संख्या लक्षात घेऊन त्यांनी एन ८ मध्ये शिरकाव केला. येथील बोटॅनिकल गार्डनमध्ये टॉय ट्रेन सुरू करण्यासाठी ३० लाख रुपयांचा निधी दिला. रूळ टाकले नसल्याने ही ट्रेन मागील दीड महिन्यांपासून उद्यानात पडून होती. आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दर्डा यांनी ही बाब लक्षात आणून दिल्यावर रूळ टाकण्याच्या कामाचा स्वतंत्र उद्धाटन समारंभ एक सप्टेंबरला खैरे यांच्या हस्ते झाला.
चेकमेट देण्यासाठी
दर्डा यांनी गेल्या आठवड्यात कमळ तलाव, ट्रॅफिक गार्डनच्या कामांचे एकाच दिवशी तासाभराच्या अंतराने भूमिपूजन करीत मनपातील सत्ताधा-यांची अडचण केली होती. त्यात महापौर वगळता युतीच्या पदाधिका-यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले होते. त्याला चेकमेट देण्यासाठी दर्डांच्या गाडीचे रूळ टाकण्याचे काम खैरेंनी केल्याचा सूर खैरे समर्थकांनी लावला आहे.