आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'कोणीतरी सिंघम व्हा अन एकदा ताकद दाखवून द्या' काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचीही इच्छा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- आघाडीतील जागावाटपासाठी मुंबई अन् दिल्लीकडे डोळे लावून बसलेल्या जिल्ह्यातील काँग्रेस तसेच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा संयम सुटत आहे. कोणात दम आहे हे दाखवून देण्यासाठी कोणीतरी सिंघम व्हा अन् एकत्र लढायचे की नाही हे एकदाचे स्पष्ट करा.
पुरे झाला हा ड्रामा, अशाच प्रतिक्रिया समोर आल्या. अर्थात नाव न छापण्याच्या अटीवरच हे कार्यकर्ते बोलते झाले. विशेष म्हणजे वरील प्रतिक्रिया देणाऱ्यांमध्ये शहराच्या तीन मतदारसंघांतील काही इच्छुकांचाही समावेश आहे. जोपर्यंत पक्षादेश येणार नाही, तोपर्यंत अधिकृतपणे बोलूच शकत नाही, असे सांगण्यास ते विसरले नाहीत. गेल्या पंधरा वर्षांपासून हे दोन पक्ष एकत्र लढत आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यापासूनच आघाडी होणार की नाही, यावर काथ्याकूट सुरू आहे. सत्ता टिकवायची असेल तर एकत्र राहिलेलेच बरे, असे सर्वांनाच वाटते. मात्र युतीतील तणातणीप्रमाणे जागावाटपात हे दोन्ही मित्रपक्षही तोच कित्ता गिरवताहेत. गतवेळी अनपेक्षितपणे सत्ता मिळाल्यामुळे गब्बर झालेल्या कार्यकर्त्यांना या वेळी सत्ता हातून जाण्याची भीती वाटते. मात्र आघाडी झाली नाही तर पुन्हा आपले फावेल,असा विश्वासही त्यांना वाटतो.
सत्तेसाठी एकत्र
हे दोन्ही पक्ष धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी नव्हे तर फक्त सत्तेचे पात्र आपल्याकडेच हवे म्हणून एकत्र आले असल्याचे तीन वेळा नगरसेवक राहिलेल्या एका ज्येष्ठ नगरसेवकाने सांगितले. मोदी लाट आटल्यामुळे पुन्हा सत्ता मिळू शकते, असेही काहींना वाटत असून सत्ता मिळाल्यास प्रमुख कोण, यावरून हा वाद सुरू असल्याचे पवार कुटुंबीयांच्या निकटवर्तीय असलेल्या एका कंत्राटदार नगरसेवकाने सांगितले.