आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेवटच्या क्षणी सावे यांच्या उमेदवारीवर पक्षाचा शिक्का, पूर्व मतदारसंघातून केणेकरांचे नाव कापले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- भाजपचे सरचिटणीस सुजितसिंग ठाकूर यांचा मोबाइल दुपारी अडीचच्या सुमारास खणखणला. त्यांनी तत्काळ उचलत, बोला देवेंद्रजी म्हटले. काही क्षण दोघांत बोलणे झाले आणि औरंगाबाद पूर्वच्या उमेदवारीवरून सुरू असलेला घोळ संपला. दोन वर्षांपासून तयारी करत असलेल्या अतुल सावे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. त्याच क्षणाला संजय केणेकर यांचा चेहरा पडला. स्वत:ला सावरत त्यांनी संतापही व्यक्त केला.
भाजपच्या पहिल्या यादीत सावेंचे नाव नसल्याने चर्चेला ऊत आला होता. ते शिवसेनेच्या संपर्कात असल्याने नाव थांबवण्यात आल्याचे म्हटले जात होते. दुसरीकडे केणेकर यांनी स्मृती इराणी यांच्याकडून तिकीट आणल्याचे सांगण्यात येत होते. आज अखेरचा िदवस असल्याने उमेदवारी कोणाला? याविषयी प्रचंड सस्पेन्स होता. या दोघांनाही अर्ज दाखल करा, बाकीचे नंतर बघू, असे निरोप सकाळी मिळाले. त्यानुसार दुपारी एक वाजता ते निवडणूक कार्यालयात समर्थकांसह पोहोचले.
एक तास घोळ: भाजप शहराध्यक्ष बापू घडामोडे, भागवत कराड, शिरीष बोराळकर, दिलीप थोरात, अनिल मकरिये यांच्यासह भाजपचे पदाधिकारीही तेथे होते. दोघांनी अर्ज दाखल केले. भाजपने केलेल्या सर्वेक्षणात केणेकर यांचे नाव आघाडीवर असल्याने त्यांचे नाव फायनल होणार, असे त्यांचे समर्थक म्हणत होते, तर सर्व्हे बोगस असल्याचा सावे समर्थकांचा दावा होता. यामुळे तणाव निर्माण झाला होता. दर पाच मिनिटांनी सावे, केणेकरांना घेऊन ठाकूर समजावून सांगत होते. परंतु श्रेष्ठींकडून निरोप येत नसल्याने त्यांचीही कोंडी होत होती. अखेर अडीचच्या सुमारास ठाकूर यांना निरोप आला आणि सावे समर्थकांचे चेहरे खुलले.
सावेच हवे होते: खैरे
खासदार चंद्रकांत खैरे हे कला ओझा यांच्यासमवेत फॉर्म भरण्यासाठी आले होते. त्या वेळी केणेकरांचे नाव फायनल होणार असल्याचे त्यांना कळाले. त्यावर त्यांनी अरेरे! अतुलचे व्हायला हवे, असे म्हटले होते.