आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1995 मधील विक्रम आजही आहे अबाधित, 1972 पासून वाढत गेली उमेदवारांची संख्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- यंदाच्याविधानसभा निवडणुकीत 11 विधानसभा मतदारसंघातून 198 उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली आहे. जिल्ह्यातील राजकीय सत्ता स्पर्धेची रंगत दर निवडणुकीला वाढत गेल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येते. 1972 मध्ये 43 उमेदवार 13 विधानसभा मतदारसंघातून उभे होते. तर आज 2014 मध्ये 11 मतदारसंघातून तब्बल 198 उमेदवारांनी निवडणूक लढवण्यासाठी आपले राजकीय अस्तित्व पणाला लावले आहे.
आजवरच्या राजकीय आखाड्यावर नजर टाकली तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (1999) चा अपवाद वगळला तर एकत्रच लढले आहेत, तर भाजप-सेना युतीही एकत्रच लढली आहे. त्यामुळे तिरंगी सामने पहायला मिळाले. पण या वेळी पहिल्यांदा चौरंगी, पहायला मिळाले आहे. सर्वात कमी उमेद्वार बाशी (1972), मोहोळ (1998, 1985, 1972). सांगोला (1980, 1985), उत्तर सोलापूर (1995) या मतदारसंघात प्रत्येकी दोन, दोन उमेदवार रिंगणात राहील्याने थेट लढती पहायला मिळाल्या. सर्वात कमी उमेदवारही याच मतदार संघात राहिले. सर्वाधिक उमेदवार या निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार दक्षिण सोलापूरमधून 30 आहेत. पण 1995 मध्ये सोलापूर शहर दक्षिणमधून 38 उमेदवार रिंगणात असल्याचा विक्रम आहे.
सर्वाधिक जिंकणारे उमेदवार
10 गणपतरावदेशमुख
06 सुशीलकुमारशिंदे
06 विजयसिंहमोहिते
06 आनंदरावदेवकते
05 सुधाकरपरिचारक
05 दिलीपसोपल