आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेच्या व्हॉट्स अ‍ॅप प्रचाराने वाढला मतदारांमधील संभ्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- लोकसभा निवडणुकीत भाजपने व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवरून प्रचार करत धूम उडवून दिली होती. त्याच शस्त्राचा शिवसेनेने धारदार वापर सुरू केला आहे. शिवाय काँग्रेस, राष्ट्रवादीसह मनसेनेही मोदींविरोधात आरोपांच्या फैरी झाडणे सुरू केले आहे. महाराष्ट्रासोबत गुजरातची तुलना, मराठी माणसाचा मुद्दा सोशल मीडियावरून आक्रमक रीतीने मांडला जात आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या औरंगाबादेतील विक्रमी सभेनंतर औरंगाबादकरांमध्ये संभ्रम वाढला असल्याचे ह्यदिव्य मराठी'च्या सर्वेक्षणात समोर आले आहे.
चार महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेसोबत भाजपची युती होती, तरीही महाराष्ट्रात मोदी हेच स्टार प्रचारक होते. त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद होता. अनेक मतदारसंघांत त्यांच्या सभांमुळे पारडे युतीच्या बाजूने कमालीचे झुकले, हे निकालाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले. मात्र, विधानसभेत युती, आघाडी तुटली. काँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना-भाजपने स्वतंत्र लढण्याचे ठरवले. यामुळे मतदारांचा कौल लोकसभेच्या आधारावर जाणून घेणे महत्त्वाचे होते. शिवाय मोदींच्या सभांचा लोकांवर किती परिणाम होतो, मोदींनी मांडलेल्या मुद्द्यांच्या आधारे मतदान कुणाला करायचे, याविषयी लोक ठाम निर्णय घेतात की नाही, याची चाचपणी करण्यासाठी ह्यिदव्य मराठीह्णने सर्वेक्षणाचा प्रयोग केला.

कसे केले सर्वेक्षण
30 सप्टेंबर रोजी म्हणजे मोदींच्या सभेची तारीख निश्चित होण्यापूर्वी ह्यदिव्य मराठीह्णच्या प्रतिनिधींनी विविध क्षेत्रांतील 350 पेक्षा अधिक लोकांशी संपर्क साधला. यात प्रामुख्याने महिला, सरकारी व खासगी नोकरदार, डॉक्टर, इंजिनिअर, रिक्षाचालक, भाजी विक्रेते, युवकांचा समावेश होता.
त्यांना कुणाचे सरकार येईल असे वाटते, एवढा एकच प्रश्न विचारला. मोदींची सभा झाल्यानंतर पुन्हा 350 पेक्षा अधिक लोकांशी संपर्क साधून त्यांना कुणाचे सरकार येईल असे वाटते, हाच प्रश्न विचारला.

पहिल्या सर्व्हेतील मते
पहिल्या सर्वेक्षणात 39 टक्के लोकांनी भाजपचे सरकार येईल, असे मत व्यक्त केले होते. 13 टक्क्यांनी सांगता येत नाही, असे उत्तर दिले होते. 12 टक्के लोक शिवसेनेचे सरकार येणार असे मत व्यक्त करत होते. युतीची सत्ता येईल, आघाडीची सत्ता येईल, काँग्रेसला संधी िमळेल, नवी समीकरणे बनतील, अशीही उत्तरे मिळाली.