आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपची सत्ता नेहमीच शिवसेनेच्या मुळावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- लोकसभेत घवघवीत यशामुळे भाजपने शिवसेनेसोबतची 25 वर्षांची मैत्री तोडली. निकालानंतर दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील अशी आशा असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युतीचे ग्रहयोग संपवा या विधानामुळे भविष्यात पुन्हा युती होण्याच्या शक्यतेला दूर सारले. भाजपला स्वबळावर सत्ता देण्याच्या मोदींच्या आवाहनाने प्रमोद महाजन यांच्या ह्यशत-प्रतिशत भाजप या घोषणेची आठवण करून दिली. केंद्रात वाजपेयी सरकार आल्यानंतर ह्यशत-प्रतिशतह्णची घोषणा दिली गेली. आता पुन्हा मोदींच्या रूपाने केंद्रात सत्तारूढ झाल्यानंतर भाजपने सेनेशी मैत्रीच तोडली असून स्वबळाची भाषा सुरू केली आहे.
हिंदुत्वाच्या समान धाग्यावर 1989 मध्ये शिवसेना-भाजपची मैत्री झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या पुढाकाराने झालेल्या युतीने नंतर सर्व निवडणुका एकत्र लढवल्या. 1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारमुळे भाजपला पहिल्यांदा ह्यअहंकारह्ण निर्माण झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते. सरकारची दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच 2001 मध्ये युतीचेच शिल्पकार प्रमोद महाजन यांनी ह्यशत-प्रतिशत भाजपह्णचा नारा दिला. महाजन यांच्यासहित राज्यातील सर्व भाजप नेत्यांनी अचानक घेतलेल्या अशा पवित्र्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वांची खरडपट्टी काढली होती. शिवाय दुसऱ्या फळीतील भाजप व शिवसेना नेत्यांमध्येही त्यामुळेच अनेकदा खटके उडाल्याचे आपल्या ऐकिवात आहे. या घटनाक्रमांचे स्मरण करून देण्याचे कारण म्हणजे आता ह्यशत-प्रतिशत भाजपह्ण या नाऱ्याला प्रत्यक्षात आणण्याची प्रक्रिया भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी सुरू केली आहे. मोदी यांची देशाने पंतप्रधानपदी निवड केल्यानंतर वाजपेयी यांच्या नेतृत्वाप्रमाणे पुन्हा स्वबळाचा सूर आळवला जात आहे. शिवसेनेची ठिकठिकाणी कोंडी करून फक्त भाजप उमेदवाराला विजयी करण्यासाठी मोदी प्रयत्न करत आहेत. युती तोडण्याची रंगीत तालीमदेखील मोदी यांनीच करून घेतल्याचा संशय येत आहे. ह्ययुतीचा ग्रहयोग संपवाह्ण हे त्यांचे विधान त्यास पुष्टी देणारे ठरले आहे. केंद्रात सरकार आले की भाजपला स्वबळाच्या उकळ्या येतात. पहिल्या सरकारमध्ये ह्यशत-प्रतिशतह्ण अन् आता नमोयुगामुळे तर मैत्री तोडण्याचा निर्णय होऊन हिंदुत्ववादी मतांचे नुकसान केले जात आहे. बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात नेमके काय दडले आहे, हे पाहण्यासाठी आता निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

ओम.. नमो..शहाह्णमुळे युती तुटल्याची सगळीकडेच चर्चा
युतीतील जागावाटप होण्यापूर्वी भाजपने ओम माथूर या नेत्याची भाजपचे प्रभारी म्हणून नेमणूक केली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती तुटेल या उद्देशानेच त्यांनी चर्चा केली. त्यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी युती तोडण्याचा निर्णय घेण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य बहाल केले होते. त्यामुळे ओम माथूर यांनी राज्यातील नेत्यांना युती तोडण्याचे आदेश दिले. तत्पूर्वी दोघांनीही नरेंद्र मोदी यांच्याशी मैत्री तोडण्याच्या विषयावर चर्चा केली असावी. लोकसभेत "नमो' प्रभावामुळेच सेनेने 18 जागा जिंकल्या. त्यामुळेच भाजपला ह्यअहंकारह्ण आला. म्हणूनच त्यांनी युती तोडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.