औरंगाबाद- विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि काँग्रेस, राष्ट्रवादीसह मनसे, भाकप आदी पक्ष मैदानात उतरले आहेत. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचे चित्र मांडले जात आहे. त्यात थोडे तथ्यही आहे. मात्र, किमान औरंगाबादेतील उच्चशिक्षितांत अशी स्थिती नसल्याचे ह्यदिव्य मराठीह्णच्या सर्वेक्षणात समोर आले आहे. 80 टक्के उच्चशिक्षितांनी आधी पक्ष पाहून मतदान करण्याची मानसिकता लोकसभेच्या काळातच तयार केल्याचेही स्पष्ट झाले.
औरंगाबाद शहरात पूर्व, मध्य आणि पश्चिम असे तीन मतदारसंघ असून 65 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यातील काहींनी पक्ष बदलले, तर काही अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. प्रादेशिकतेचा मुद्दा हाती घेऊन शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पंतप्रधान मोदींच्या विरोधात आरोपांच्या फैरी झाडणे सुरू केले आहे. व्हॉट्सअॅप,
फेसबुकवर गुजरात विरुद्ध महाराष्ट्र असे वातावरण तयार होत आहे. काही मतदारांना कोणत्या पक्षाच्या बाजूने जावे, हा संभ्रम आहे. या पार्श्वभूमीवर निर्णायक मतदान असलेला सर्वधर्मीय, सर्वजातीय उच्चशिक्षित वर्ग कुणाच्या बाजूने झुकणार, असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला. त्याचे उत्तर शोधण्यासाठी ह्यदिव्य मराठीह्णने सर्वेक्षण केले.
कसे केले सर्वेक्षण?
त्र हेल्थ क्लब, भाजी बाजार, जॉगिंग ट्रॅक येथे विविध व्यवसाय, उद्योगांशी संबंधित 450 उच्चशिक्षितांच्या भेटी घेतल्या. यात सरकारी, निमसरकारी अधिका-यांचाही समावेश होता. संभ्रमाचे वातावरण आणि पुढे होणारे मतदान याबद्दल त्यांच्याशी चर्चा केली.
कोणते होते 3 प्रश्न
त्रतुम्ही संभ्रमात आहात का?
त्रकोणत्या मुद्द्यावर मतदान करणार?
त्रमतदानाचा निर्णय तुम्ही कधी घेतला?