आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहायक कुलसचिवांच्या मुलाखतीवरही गंडांतर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिवपदासाठी एकही व्यक्ती पात्र ठरल्याचे प्रकरण ताजे असताना आता सहायक कुलसचिवपदाच्या दोन जागांसाठी होऊ घातलेल्या मुलाखतीवरही गंडांतर आले आहे. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी तीन जणांनाच मुलाखतीसाठी पात्र धरण्यात आले असल्यामुळे अपात्र ठरलेले उमेदवार किरणकुमार वनवे या उमेदवाराने खंडपीठाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यामुळे २७ जुलै रोजी होणाऱ्या मुलाखती पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता आहे.
विद्यापीठात १२ सहायक कुलसचिव आणि १२ उपकुलसचिवांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी प्रत्येकी फक्त पदांवरच अधिकारी आहेत. त्यामुळे सहायक कुलसचिवांच्या दोन जागांसाठी सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता मुलाखती घेण्याचे निश्चित करण्यात आले होते. यासंदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या संकेतस्थळावर गुरुवारी (२३ जुलै) माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. तत्पूर्वी २०१२ मध्ये याची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर प्रत्यक्ष मुलाखतीसाठी २३ जुलैला रात्री सूचना देऊन लगेच २७ जुलैला मुलाखती घेण्याचा घाट रचण्यात आला असल्याचे वनवे यांनी सादर केलेल्या याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे खंडपीठाने सहायक कुलसचिवपदाची निवड करू नये, अशा आशयाचे पत्र दिल्याची माहिती आहे. खुल्या प्रवर्गातून गुलाब नागे, डॉ. सुनीता राठोड आणि भूषण बावीस्कर यांना मुलाखतीला बोलावण्यात आले आहे, तर भटक्या विमुक्त प्रवर्गातून रामनाथ पवार, डॉ. सुनीता राठोड आणि संजय पवार यांना बोलावले आहे. एक पद पदोन्नतीने, तर एक पद थेट सरळ सेवा भरतीअंतर्गत भरावयाचे आहे.

...मी तर मेरिटमध्ये
एकीकडेमेरिटचे उमेदवार मिळत नसल्याची ओरड केली जाते, दुसरीकडे मात्र मला लेखी परीक्षेत ७० पैकी ५३ गुण प्राप्त झालेले असून मी टॉपर आहे. तरीही मला कॉल लेटर देण्यात आले नाही. एकूण चार पदे भरण्यात येणार आहेत. त्यापैकी खुल्या प्रवर्गातील सहायक कुलसचिवांची तीन, तर भटक्या विमुक्ताचे एक पद आहे. किरणकुमारवनवे