आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तत्कालीन प्रभारी परीक्षा नियंत्रक गायकवाड अडचणीत, मुलाचे गुण वाढवल्याचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव आणि परीक्षा नियंत्रक पदावर असताना कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांनी नियमबाह्यपणे आपल्या मुलाचे गुण वाढवून त्याला उत्तीर्ण केल्याचा आरोप झाल्यामुळेच त्यांना कुलगुरूंनी तडकाफडकी दोन्ही पदांवरून हटविल्याचे समोर आले आहे. मात्र, या प्रकरणी कॅप्टन गायकवाड यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचा निर्णय झाल्यामुळे विद्यापीठातील कर्मचारी संघटनेचा रोष कायम आहे.

रसायनशास्त्र विभागातील डॉ. सुरेश गायकवाड यांच्याकडे एकाचवेळी प्रभारी कुलसचिव, प्रभारी परीक्षा नियंत्रक आणि बीसीयूडीचे प्रभारी संचालक असा अतिरिक्त कारभार सोपवण्यात आला होता. डिसेंबर महिन्यात कुलगुरूंसह अनेक ज्येष्ठ अधिकारी रत्नागिरी उपकेंद्राला भेट देण्यासाठी गेले असताना कुलगुरुपदाचाही प्रभार याच कॅप्टन गायकवाड यांच्याकडे होता. एकाच व्यक्तीकडे इतके पदभार देण्यात आल्यामुळे तो चर्चेचाही विषय ठरला होता. मात्र, १५ जानेवारी रोजी कुलगुरू डॉ. चोपडे यांनी गायकवाड यांच्याकडील प्रभारी पदांचा सर्व भार अचानक काढून घेतला आणि त्यांना आपल्या पूर्वपदावर परत पाठवले.

चौकशी न करताच काढले पदभार
कॅप्टन गायकवाड यांच्यावर आरोप करणारे निवेदन देताना संघटनेने या प्रकरणी तातडीने चौकशी समिती नेमण्याची विनंतीही कुलगुरूंना केली होती. मात्र, कुलगुरूंनी केवळ पदभार काढून घेत चौकशी समिती नेमण्याचे टाळले. त्यामुळे हे प्रकरण थंड बस्त्यात गेले. कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष बोरीकर आणि उपाध्यक्ष नितीन गायकवाड यांनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून कॅप्टन दोषी आढळल्यास त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, कोणतीही चौकशी न करताच पदभार काढल्यामुळे कॅप्टन गायकवाड यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

यांनी केला पाठपुरावा
विद्यापीठात अनेक वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ मागासवर्गीय शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना कार्यरत आहे. संघटनेचे पदाधिकारी सुभाष बोरीकर, नितीन गायकवाड, प्रकाश निकाळजे, विजय जाधव, नंदु खोब्रागडे यांनी हे प्रकरण लावून धरले आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, काय आहेत आरोप