आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापूरमधून विसर्ग वाढला; दारणातून मात्र घटवला; जायकवाडीत 10 टीएमसीपर्यंत पाण्याची अावक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- जिल्ह्यात दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाचा जोर कुठे कायम तर कुठे कमी असल्याने धरणांतून होणारा विसर्गही कुठे अधिक तर कुठे कमी करण्यात आला आहे. गंगापूर धरणातील पाणी विसर्ग ८२०  क्यूसेकने वाढविण्यात आला. दारणातील विसर्ग १०७५० वरून ८७५० क्यूसेक म्हणजे दोन हजार क्यूसेकने कमी करण्यात आला आहे.  दरम्यान, गेल्या अाठवड्यापासून ८ ते १० टीएमसी पाणी नांदूर मधमेश्वरमधून जायकवाडीसाठी गाेदावरी नदीतून साेडण्यात अाले अाहे.

नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी या चार  तालुक्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे धरणांमधील पाणीपातळी वेगाने वाढली आहे. शहराला पाणी पुरवठा करणारे गंगापूर धरण ७५ टक्के भरले असून दारणा धरणही ७५ टक्क्यांवरच आहे. शिवाय पाणलोट भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असल्याने धरणांतही पाण्याची वेगाने आवक असल्याचे आणि जुलै महिनाच सुरू असल्याने आता पाटबंधारे विभागाकडून गत चार दिवसांपासून खबरदारी म्हणून धरणातून विसर्ग करण्यात येत आहे. गंगापूर, दारणा धरणासह शहरातील पाणी गोदावरी, दारणा नद्यांद्वारे नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून मराठवाड्याच्या दिशेने सोडले जात आहे. एक वेळा ५१ हजार क्यूसेकने करण्यात आलेला नांदूरमधमेश्वरमधील विसर्ग कमी करत आता तो १७ हजारवर आणण्यात आला. दारणातून ८७५० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी हा विसर्ग १० हजार क्यूसेकपर्यंत वाढविण्यात आला होता. गंगापूर धरणक्षेत्रात मात्र पावसाचा जोर कायम असल्याने या धरणातून करण्यात येणारा विसर्ग वाढविण्यात आला आहे.