आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षे घराबाहेर राहून मिळवले अाॅलिम्पिकचे तिकीट !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद - जिद्द मेहनत करण्याचे बळ अंगात असले तर जगात काेणतीही गाेष्ट अशक्य नाही, याचाच प्रत्यय भारताची अव्वल धावपटू ललिता बाबरने अाणून दिला. सातारा जिल्ह्यातील माेही गावच्या कच्च्या रस्त्यावरून धावत धावत या युवा खेळाडूने अाॅलिम्पिकच्या ट्रॅकवर धावण्याच्या संधीला गवसणी घातली. तिने तब्बल हजार ८७ दिवस घराबाहेर राहत अथक परिश्रमांतून हजार ३२७ किमी अंतरावर असलेल्या ट्रॅकवर धावण्याचे स्वप्न सत्यात उतरवले.
वुहान येथील अाशियाई स्पर्धेतील चमकदार कामगिरीमुळे ललिताला रिओ अाॅलिम्पिकचे तिकीट मिळवता अाले. अाता अागामी अाॅगस्टमध्ये ब्राझीलमध्ये हाेणाऱ्या अाॅलिम्पिक स्पर्धेत ती महिलांच्या तीन हजार मी.स्टीपल चेसमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार अाहे. हे तिकीट मिळवण्यासाठी तिने केलेला संघर्ष देशभरातील अनेक युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरणारा अाहे.

१४ वर्षांच्या मेहनतीचे फळ : शालेय स्पर्धांतील साेनेरी यशानंतर ललिताला नवीन अाेळख निर्माण करता अाली. याच दरम्यान अाॅलिम्पिकसारख्या माेठ्या स्पर्धेत देशाचे नाव उंचावण्याचा निर्धार तिने केला. यासाठी १४ वर्षे घेतलेल्या मेहनतीचे फळ तिला मिळाले. तिने २०१४ मध्ये काेरियात अाशियाई गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवली अाणि त्याचे साेने केले.
मेहनतीचे फळ मिळणार!
अातापर्यंत प्रत्येक कष्टाचे फळ मिळत गेले. अाता अाॅलिम्पिकसाठीच्या मेहनतीचे फळ पदकाच्या रूपात मिळेल. -ललिता बाबर, धावपटू
ट्रॅकवरची ‘वेगवान’ कामगिरी
- २०१४ अाशियाई गेम्स राैप्यपदक
- २०१५ अाशियाई स्पर्धा सुवर्णपदक
- २०१५ वर्ल्ड चॅम्पियनशिप वे स्थान

शासनाचे दुर्लक्ष; स्वत: शूज घेतले
ललिताने भारताला काेरियातील अाशियाई स्पर्धेत कांस्य वुहान येथील अाशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिले. यातून महाराष्ट्राच्या शिरपेचात कर्तृत्वाचा तुरा खोवला गेला. शासनाकडून तिला छदामही देण्यात अाला नाही. मात्र, तिने जिद्द साेडली नाही. स्वखर्चातून तीन लाखांचे शूज विकत घेतले. यावर सध्या रिओतील स्पर्धेचा सराव करत अाहे.