आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएम कार्डाची अदलाबदल करून ३८ हजार रुपये लंपास, दोन महिन्यांतील दुसरी घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मक फोटो - Divya Marathi
प्रतिकात्मक फोटो
वाळूज - मोरे चौक बजाजनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडियातून काढलेले लाख ८० हजार रुपये प्रताप चौकात लुटण्याची घटना ताजी असतानाच पुन्हा याच बँक शाखेच्या एटीएममधून रांजणगाव येथील एका कामगाराचे पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएम कार्ड हस्तगत करून परस्पर ३८ हजार ८०० रुपये काढून फसवणूक केल्याची घटना १३ जुलै रोजी उघडकीस आली. घटनेला तीन दिवस उलटूनही पोलिसांत नोंद नाही.

औद्योगिक परिसरात वेल्डिंगचे काम करणारे विठ्ठल तुकाराम इंगळे (रा. शिक्षक कॉलनी, रांजणगाव) हे १० जुलै रोजी मोरे चौक येथील एसबीआय बँकेलगतच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले. समोरील व्यक्तीचे पैसे काढून होताच मला पैसे काढून द्या, म्हणून त्या व्यक्तीकडे मदत मागितली. त्या व्यक्तीने इंगळे यांना पासवर्ड मागून त्यांनी सांगितल्याप्रमाणे पैसे काढून दिले. इंगळे यांच्या खात्यातील शिल्लक रक्कम पाहून त्या व्यक्तीने इंगळे यांचे एटीएम कार्ड परत करताना हातचलाखी केली. त्याने स्वत:जवळील एटीएम कार्ड इंगळे यांना दिले इंगळे यांचे कार्ड स्वत:कडे ठेवून धूम ठोकली. इकडे आपल्या कार्डाप्रमाणे हुबेहूब दिसणारे एटीएम पाहून शंका आल्यामुळे इंगळे निश्चिंतपणे घरी परतले. मात्र, तीन दिवसांनंतर आपल्या मोबाइलवर पैसे काढल्याबाबतचे मेसेज येत असल्यामुळे घाबरलेल्या इंगळे यांनी बँकेशी संपर्क साधला. त्या वेळी त्यांना पोलिसांत जाण्याचा सल्ला देण्यात आला. अखेर १६ जुलेै रोजी त्यांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाणे गाठले. मात्र, तेथेही त्यांची कैफियत एेकायला कोणी तयार नसल्यामुळे इंगळे निराश होऊन घरी परतले.

पैसे काढल्याचा मेसेज
हातचलाखीनेइंगळेंचे एटीएम कार्ड हडपलेल्या व्यक्तीने तीन दिवसांनंतर १३ जुलै रोजी सायं. ७.१२ वा. १० हजार रुपये काढले. पाच मिनिटांच्या अवधीतच प्रत्येकी १० हजार याप्रमाणे तीनदा ३० हजार, तर एक वेळा हजार असे एकूण ३८ हजार रुपये आरोपीने इंगळे यांच्या एटीएम कार्ड पासवर्डचा वापर करून पंढरपूर-वाळूज रोडवरील गरवारे पॉलिस्टर परिसरातील एटीएममधून काढले. त्यानंतर त्याने ७.१९ वाजता पंढरपूर येथील एटीएममधून ८०० रुपये काढले. प्रत्येक वेळच्या ट्रान्झॅक्शनचे मेसेज इंगळे यांच्या मोबाइलवर येत असल्यामुळे त्यांनी मोबाइल परिचितास दाखवून मेसेजबाबत माहिती घेतली असता त्यांच्या अकाउंटमधून कोणीतरी परस्पर रक्कम काढत असल्याचे लक्षात आले. सध्या त्यांच्या अकाउंटवर केवळ १९५ रुपये शिल्लक आहेत.

ती व्यक्ती कोण
एटीएमकार्डाची अदलाबदल करण्यापूर्वी त्याने स्वत:च्या एटीएमचा वापर करून याच एसबीआयच्या एटीएममधून एक हजार रुपये काढले होते. नंतर त्याने हे एटीएम इंगळे यांच्या एटीएमशी अदलाबदल केले. त्यावर ‘रघुनाथ बी. माढेकर’ असे नाव आहे. या नावाची व्यक्तीच खरी आरोपी आहे की इंगळेंप्रमाणे सदरील भामट्याच्या गळाला लागलेला तो एखादा अशिक्षितच आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुसरीही घटना ठाण्याच्या हद्दीत
दोनमहिन्यांपूर्वी अशाच प्रकारे एका तरुणाचे १८ हजार रुपये एटीएम कार्डाची अदलाबदल करून लांबवल्याची घटना वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याच्याच हद्दीत घडली होती. या आरोपीचा अद्याप शोध लागलेला नसताना पुन्हा अशीच घटना घडल्यामुळे हाच तर तो आरोपी नसावा, अशीही चर्चा होत आहे.

आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद?
संबंधितबँकेच्या एटीएमच्या बाहेर आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सक्रिय आहेत; परंतु पोलिसांनी सदरील फुटेजजी मागणी केल्यानंतरच ते दाखवण्यात येईल, असे या बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे सदरील आरोपी हा फुटेजमध्ये कैद आहे की नाही, याबाबतचे गुपित पोलिस चौकशीअंतीच समोर येईल.
बातम्या आणखी आहेत...