औरंगाबाद - शहरातील गारखेडा परिसरातील सूतगिरणी चौकात असलेला भारतीय स्टेट बँकच्या (एसबीआय) च्या एटीएमला आज (बुधवार) साकळी 7 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये मशीनमधील 15 लाख रुपयांची रोकडे जळून खाक झाली आहे. घटनेच्यावेळी एटीएम ऑफलाइन होते. परिसरातील नागरिकांनी या बाबत तत्काळ अग्नीशमन विभाग आणि बँक अधिकाऱ्यांना माहिती दिली. अग्नीशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर येत आगीवर नियंत्रण मिळवले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.